Teacher recruitment scam exposed case registered against brother along with Commissioner of State Examination Council cheating 46 people esakal
पुणे

Teacher Recruitment Scam : शिक्षक नोकरभरती घोटाळा उघडकीस

राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्तांसह भावाविरुध्द गुन्हा दाखल, ४६ जणांची फसवणूक

सकाळ वृत्तसेवा

पुणे : शिक्षक पदावर नोकरी देण्याचे आमिष दाखवून ४६ जणांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त शैलजा दराडे यांच्यासह भावाविरुध्द हडपसर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या कथित नोकरभरती गैरव्यवहारामुळे शिक्षण विभागात खळबळ उडाली आहे.

या संदर्भात शिक्षक पोपट सुखदेव सूर्यवंशी (रा. खानजोडवाडी, ता. आटपाडी, जि. सांगली) यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून हडपसर पोलिसांनी शैलजा रामचंद्र दराडे (रा. रेव्हेरायीन ग्रीन्स, पाषाण, पुणे) आणि दादासाहेब रामचंद्र दराडे (रा. अकोले, ता. इंदापूर) यांच्याविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार १५ जून २०१९ पासून सुरु होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शैलजा दराडे परीक्षा परिषदेच्या आयुक्त आहेत. तर, दादासाहेब दराडे हे त्यांचे भाऊ आहेत. दादासाहेब दराडे याने त्यांची बहीण शैलजा दराडे या शिक्षण विभागात प्रशासन अधिकारी आहेत, असे सांगून फिर्यादीचा विश्वास संपादन केला. फिर्यादीच्या दोन नातेवाइकांना शिक्षक पदावर नोकरी लावतो,

असे सांगून त्याने प्रत्येकी १२ लाख आणि १५ लाख रुपये घेतले. परंतु त्यांना आजपर्यंत शिक्षक म्हणून नोकरी लावली नाही. त्यामुळे फिर्यादीने पैसे परत करण्याची मागणी केली. मात्र, आरोपींनी दोघांचेही पैसे परत केले नाहीत.

प्राथमिक तपासात या दोघांसमवेत इतर ४४ जणांची फसवणूक झाल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. दरम्यान, आयुक्त शैलजा दराडे यांनी त्यांचा भाऊ दादासाहेब दराडे याच्याशी काहीही संबंध नाही. परीक्षा परिषदेचा आयुक्त असल्याचा गैरफायदा घेऊन तो लोकांना नोकरी लावून देतो, असे सांगत आहे.

दादासाहेब दराडे याच्यासोबत कोणीही कसलाही व्यवहार करु नये, अशी जाहीर नोटीस शैलजा दराडे यांनी ऑगस्ट २०२० मध्ये दिली होती, असे सांगण्यात आले. याबाबत आयुक्त शैलजा दराडे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांचा फोन बंद असल्यामुळे तो होऊ शकला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MLA Subhash Deshmukh: सत्तेची फळे चाखण्यासाठीच भाजपमध्ये इनकमिंग: आमदार सुभाष देशमुख; विरोधकांना पराभव दिसू लागला

Latest Marathi Live Update News: गेवराई नगर परिषदेवर पुन्हा पवारांचा झेंडा फडकणार की पंडित बाजी मारणार

PMRDA News : प्रत्यक्ष स्थळ पाहणीनंतरच विकास परवानगी; अवैध बांधकामे रोखण्यासाठी ‘पीएमआरडीए’चा निर्णय, ‘पेपर मंजुरी’ला पूर्णविराम

D-Mart मध्ये शॉपिंगची तयारी करताय? आधी हे वाचा... नाहीतर खिसा होणार रिकामा! मुंबईतील धक्कादायक प्रकाराने सगळे हैराण

Google Maps : गुगल मॅपमध्ये गेमचेंजर फीचरची एन्ट्री; ट्रॅफिक, छुपे कॅमेरे अन् लँडमार्कची अचूक माहिती..कसं वापरायचं? पाहा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT