Teacher esakal
पुणे

Teacher Recruitment : शिक्षण विभागाने रखडवली शिक्षकांची नियुक्ती

आंतरजिल्हा बदलीतून शिक्षक पुणे महापालिकेसाठी नियुक्त करण्याचा प्रस्ताव शिक्षण विभागाने आजपर्यंत (बुधवार) अडवून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार आला समोर.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी महापालिकेच्या शाळांमधील शिक्षकांच्या नियुक्तीची प्रक्रिया पूर्ण होणे आहे. पण आंतरजिल्हा बदलीतून २१० शिक्षक पुणे महापालिकेसाठी नियुक्त करण्याचा प्रस्ताव शिक्षण विभागाने आजपर्यंत (बुधवार) अडवून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

याप्रकरणी अतिरिक्त आयुक्तांनी शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांची झाडाझडती घेत या शिक्षकांची नियुक्ती केल्याचा आदेश त्वरित काढा अन्यथा कारवाई केली जाईल असा इशारा दिला आहे. दरम्यान महापालिकेच्या शाळेतील ३५० शिक्षकांची पदे रिक्त असताना अशा पद्धतीने अडवून करून विद्यार्थ्यांचे नुकसान करण्याचाच प्रयत्न शिक्षण विभागाने केला आहे.

उन्हाळ्याची सुट्टी संपल्याने उद्यापासून (ता. १५) महापालिकेच्या शाळेसह खासगी शाळांमध्ये पुन्हा एकदा विद्यार्थ्यांचा किलबिलाट सुरू होणार आहे. पुणे महापालिका प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या स्वागताची तयारी पूर्ण केली आहे. शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वाटप केले जाणार आहे. प्रत्येक शाळेत हे साहित्य पोचले असल्याचा दावा शिक्षण विभागाने केला आहे.

महापालिकेने नुकतेच शिक्षकांच्या सेवा ज्येष्ठतेनुसार, मुख्याध्यापक तसेच पर्यवेक्षकपदी बढती दिली आहे. मात्र, प्रत्यक्षात शाळांसाठी सुमारे ३५० शिक्षक कमी आहेत. राज्यातील शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदली अंतर्गत २१० शिक्षक पुणे महापालिकेला मिळाले आहेत. संबंधित शिक्षकांनी त्यांच्या जिल्ह्यातून कार्यमुक्तीही करून घेतली. पण महापालिकेने या शिक्षकांना अद्याप नियुक्तीच दिलेली नाही.

दोन आठवड्यापूर्वीच ही प्रक्रिया पूर्ण होणे आवश्‍यक होते. पण शिक्षण विभागाने याकडे टाळाटाळ केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पहिल्याच दिवशी शाळेत कमी शिक्षक असल्याने उपस्थित असलेल्या शिक्षकांवर अतिरिक्त जबाबदारी पडणार आहे. अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांनी यासंदर्भात शिक्षण अधिकारी मीनाक्षी राऊत यांना अद्याप हे शिक्षकांना नियुक्तीचे पत्र का दिले नाही हे विचारत आजच्या आज त्यांचे नियुक्ती पत्र द्यावेत, जे कर्मचारी अडवणूक करतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल अशा इशारा दिला आहे.

पालख्या गेल्यानंतर शाळांची स्वच्छता

शहरात दोन दिवस पालख्यांचे मुक्काम होते. त्यावेळी मध्यवर्ती भागातील महापालिकेच्या शाळांमध्ये वारकऱ्यांच्या निवासाची व्यवस्थ केली होती. आज सकाळी पालख्यांचे पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान झाल्यानंतर लगेच शाळांच्या स्वच्छतेचे काम हाती घेऊन पूर्ण करण्यात आले. त्यामुळे गुरुवारपासून शाळा सुरू करताना विद्यार्थ्यांना त्रास होणार नाही याची काळजी घेतली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur Firing : राष्ट्रीय स्वयंसेवक मुख्यालय परिसराजवळ मध्यरात्री गोळीबार, सहा जण बाईकवर आले अन्...

Sindhudurg Tourism: सिंधुदुर्ग सागरी पर्यटनासाठी ऐतिहासिक पाऊल!समुद्रात उतरणार पर्यटनाचा ‘गुलदार’; निवती येथे साकारणार पाण्याखालील संग्रहालय..

Lal Khurma: कुशीनगरचा 'लाल खुरमा' बनणार ग्लोबल ब्रँड! 'ODOC'मध्ये युपीच्या या पारंपरिक मिठाईची हवा; जाणून घ्या काय आहे खास!

Vidarbha: विदर्भाला उष्णतेच्या लाटेचा चटका, अकोला-वर्धा ४६ अंशावर; चार दिवस यलो अलर्ट

US Iran Talks: अमेरिकेच्या इराणसमोर पाच अटी; वाटाघाटींसाठी युरेनियम, अणुप्रकल्पाच्या मुद्द्यांवर भर..

SCROLL FOR NEXT