मांजरी (पुणे) : ''कोणतेही शिक्षण कधी वायाला जात नाही'' याचा प्रत्यय आज पुण्यात पाहायला मिळाला. मांजरी येथील शीतल महेंद्र नवले-पाटील या शिक्षिकेने स्वतः चा जीव धोक्यात घालून दोरीच्या साह्याने इमारतीच्या छतावरून तिसऱ्या मजल्यावरील घरात उतरत तेथे अडकलेल्या एका दीड वर्षाच्या मुलीची सुटका केली. शिक्षिकेने महाविद्यालयीन जीवनात राष्ट्रीय छात्र सेनेत सहभाग घेतला होता. त्यावेळी आपत्कालीन परिस्थितीशी सामना करण्याासाठी घेतलेल्या प्रशिक्षणाचा योग्य वापर करत या शिक्षिकेने चिमुकलीची सुटका केली.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
गोपाळपट्टी जवळील चिलई रस्त्यावरील कमल पार्क येथे रोहिदास भांडवलकर यांचे चार मजली घर आहे. त्यातील तिसऱ्या मजल्यावर सुशांत यादव हे पत्नी व आराध्या या मुलीसह भाड्याने राहत आहेत. यादव कामावर गेले होते. पत्नी व मुलगी घरी होत्या. आराध्या घरात असताना सकाळी अकरा वाजण्याच्या दरम्यान आई कपडे सुकत टाकण्यासाठी इमारतीच्या छतावर गेली होती. आई खाली आली असता घराचा दरवाजा आतून बंद झालेला होता. प्रयत्न करूनही तो उघडत नसल्याने त्या घाबरून गेल्या. घरात असलेल्या आराध्याकडून आतून कडी लागली गेली होती. तीही घाबरून रडत होती.
दरम्यान, या इमारतीसमोर असलेल्या शांताई इमारतीमध्ये राहत असलेल्या शिक्षिका शीतल नवले-पाटील या काही कामानिमित्त आपल्या घराच्या गॅलरीमध्ये आल्या होत्या. त्यांना अडकलेल्या मुलीच्या आईने पाटील यांना मदतीसाठी पाठविण्याची विनंती केली. मात्र, तेही घरी नसल्याने स्वत: शीतल तेथे गेल्या. परिस्थिती लक्षात घेऊन आराध्याच्या आईला धीर देत 'मी तीला सोडवते, काळजी करू नका,' असे सांगत पळापळ सुरू केली.
तब्बल पावणे अकरा लाखाच्या मेफेड्राॅनसह 16 लाखाचा मुद्देमाल जप्त; दोघाना अटक
स्वत:च्या दहा वर्षाच्या मुलाला इमारतीच्या छतावरून दोरीच्या साह्याने तिसऱ्या मजल्यावरील गॅलरीमध्ये उतरविण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता. मात्र, अवघड परिस्थिती असल्याने स्वत: शीतल यांनी तेथे जाण्याचा निर्णय घेतला. त्यांचे वजन पेलणारी रस्सी खाली राहणाऱ्या मालवाहू वाहनधारकांकडून घेऊन त्या इमारतीच्या छतावर गेल्या. कमरेला रस्सी बांधून त्या तिसऱ्या मजल्यावरील गॅलरीत प्रथम खिडकीचे लेंटल व नंतर खाली अशी कसरत करीत उतरल्या. घराचा गॅलरीतील दरवाजा उघडा होता. तेथून आत जाऊन रडणाऱ्या आराध्याला उचलून घेत तीला धीर दिला. आराध्याकडून आतील बाजूची लागलेली कडी उघडून तिला आईच्या ताब्यात दिले. दरम्यान, इमारती खाली जमा झालेल्या नागरिकांनी शीतल यांच्या धाडसाचे कौतूक करीत अभिनंदन केले. आराध्याच्या कुटुंबानेही त्यांचे आभार मानले.
शीतल नवले पाटील या कर्वे शिक्षण संस्थेच्या विद्यार्थिनी असून तेथेच सध्या शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. मुळच्या शिरूरच्या असलेल्या शीतल यांनी कर्वे संस्थेच्या वसतिगृहात राहून आपले शिक्षण पूर्ण केले आहे. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना राष्ट्रीय छात्र सेनेतही त्यांचा सहभाग होता. त्यामुळे त्यांना आपत्कालीन परिस्थितीशी सामना करण्याचे थोड्याफार प्रमाणात माहीत होते. या माहितीच्या आधारावर त्यांनी आराध्याला सोडवण्याचे धाडस केले.
पुण्यात हायवेलगत हॉटेलमध्ये सुरू होता वेश्या व्यवसाय; मराठी तरुणीसह दोघींची...
त्या म्हणाल्या,"दुसऱ्यांना मदत करण्याचे आई वडिलांकडून झालेले संस्कार व कर्वे संस्थेने दिलेले धडे यामुळे मी हे धाडस करू शकले. अपुऱ्या सामुग्रीच्या आधारावर मी आराध्याची सोडवणूक करू शकले याचा मला आनंद होत आहे.'
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.