Teachers and non-teaching staff will get an insurance cover of Rs 50 lakh 
पुणे

शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाना मिळणार 'विमा कवच' तेही 50 लाख रुपयांचे

सकाळवृत्तसेवा

पुणे  : कोरोनाच्या संकट काळात कोविड-19 संबंधित सर्वेक्षण, जनजागृती, मदत कार्य अशा विविध कार्यवाहीदरम्यान कर्तव्यावर असणाऱ्या राज्यातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वित्त विभागाच्या निर्णयानुसार "50 लाख रुपयांचे सर्वकष वैयक्तिक अपघात विमा कवच' लागू करण्यात आले आहे. त्यामुळे कोरोनाशी संबंधित कर्तव्यावर असताना कोविडमुळे मृत्यू झालेल्या शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या कुटूंबियांना या "विमा कवचा'चा लाभ मिळू शकणार आहे.

लातूरकडे धान्य घेऊन निघालेल्या ट्रक चालकाचा अज्ञाताकडून खून 
 

कोविड -19 विषाणूच्या अनुषंगाने सर्वेक्षण, शोध, प्रतिबंध, चाचणी, उपचार, मदत कार्य या कार्यवाहीशी संबंधित कर्तव्यावर कार्यरत सर्व कर्मचाऱ्यांना 50 लाख रुपये रक्कमेचे सर्वकष वैयक्तिक अपघात विमा कवच पुरविण्याबाबत वित्त विभागाने 29 मे 2020 मध्ये शासन निर्णय लागू केला होता. या निर्णयाप्रमाणे राज्यातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना देखील विमा कवच मिळावे, अशी मागणी विविध संघटनांमार्फत सातत्याने होत होती. त्यासाठी विविध पातळ्यांवर पाठपुरावा देखील केला जात होता. आता प्राथमिक शिक्षण संचालनालयाने राज्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मे 2020 च्या शासन निर्णयाच्या तरतुदी पूर्ण करणारे परिपूर्ण प्रस्ताव मागितले असून शासन निर्णयानुसार हे प्रस्ताव तपासून संबंधित प्रस्तावावर योग्य ती कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती अधिकृत सुत्रांनी दिली आहे.

पुण्यातील इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा 

"प्राथमिक शिक्षण संचालनालयाने उशिरा का होईना कोरोनाबाबत कर्तव्य बजावणाऱ्या शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना न्याय देणारे हे "विमा कवच' लागू करण्यासंबंधी कार्यवाही सुरू केली आहे, हे निश्‍चितच स्वागतार्ह आहे. मात्र, प्राथमिक शिक्षण विभागाबरोबरच माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागानेही याप्रमाणे कार्यवाही करण्याबाबतचा अधिकृत आदेश जाहीर करावा. जेणेकरून कोरोनासंबंधी कर्तव्य बजावताना कोरोनामुळे मृत्यू झालेल्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या कुटूंबियांना काहीसा दिलासा मिळू शकणार आहे.''
- शिवाजी खांडेकर, राज्य सचिव, महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर महामंडळ
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT