education 
पुणे

आता शिकविणे होणार सोपे;अभ्यासक्रम बदलाच्या निर्णयाचे शिक्षकांकडून स्वागत

सकाळवृत्तसेवा

पुणे - ऑनलाईन शिक्षणाद्वारे शिकविलेले विद्यार्थ्यांना नेमके किती समजले हे सांगणे आणि विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करणे सद्यस्थितीत अवघड आहे. तसेच ऑनलाईन शिक्षण देताना असणारी वेळेची मर्यादा आणि त्यात सर्व पाठ्यक्रम शिकवून वेळेत पूर्ण करणे यासाठी शिक्षक-विद्यार्थी यांच्यावर असणारे दडपण याचा विचार करता, अभ्यासक्रम कमी करण्याचा घेतलेला निर्णय स्वागतार्ह असल्याचे शिक्षकांचे म्हणणे आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने सध्या सर्वत्र ऑनलाईन शिक्षक सुरु आहे.  विद्यार्थी-विद्यार्थीनीवरील ताण कमी करण्यासाठी शिक्षण विभागाने इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतचा अभ्यासक्रम कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत शिक्षकांनी आपली भूमिका मांडली आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

येरवड्यातील गेनबा सोपानराव मोझे माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रशालेचे मुख्याध्यापक संजय सोमवंशी म्हणाले,"कोरोनामुळे शाळा बंद असल्या तरी शिक्षण मात्र सुरू आहे. लॉकडाऊन जाहीर होण्यापूर्वी गावाकडे निघून गेले विद्यार्थी आणि पालक अध्याप आपल्या घरी परतले नाहीत. कित्येक पालकांना प्रवासाची कोणतीच सोय नसल्याने अजून पाठ्यपुस्तके, निकाल घ्यायला न्यायला शाळेत येणे अशक्य आहे. काही गावांमध्ये वीज पुरवठा सातत्याने खंडित होतो, काही ठिकाणी नेटवर्कचा प्रश्न आहे. त्यामुळे मुले ऑनलाईन शिक्षणापासून वंचित आहेत. त्यामुळे यंदा विद्यार्थ्यांचे मूल्यमापन कसे करावे, हे देखील सरकारने लवकरात लवकर जाहीर करणे अपेक्षित आहे. तसेच या अभ्यासक्रमावर आधारित शिष्यवृत्ती परीक्षेचा अभ्यासक्रम देखील कमी करणे अपेक्षित आहे. प्रथम घटक चाचणी परीक्षेबाबतही मार्गदर्शन करावे"

न्यू सिटी प्राईड स्कुलच्या मुख्याध्यापिका स्वाती पवार म्हणाल्या, "कोरोनामुळे सर्वच जण खूप त्रासिक आहे.त्यामूळे अभ्यासा कडे फारसे कोणाचे लक्ष नाही. सध्याच्या परिस्थितीत   अभ्यासक्रमाबाबत घेतलेला निर्णय योग्यच आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांबरोबरच पालकांना सुद्धा दिलासा मिळाला आहे. ऑनलाईन शाळा सुरू असल्या तरी प्रत्यक्षात शिक्षण किती विद्यार्थ्यांपर्यंत पोचत असेल आणि किती जणांना ऑनलाईनद्वारे शिकविलेले नीट समजत असेल, याबाबत निश्चित काहीच सांगता येणे कठिण आहे. प्रत्येक विद्यार्थ्याची समजून घेण्याची क्षमता ही वेगवेगळी असते. त्यामुळे अभ्यासक्रम कमी केल्याने उर्वरित असलेल्या अभ्यासक्रमावर अधिक लक्ष केंद्रीत करता येईल."

एसपीएम इंग्लिश स्कूलच्या (माध्यमिक विभाग) मुख्याध्यापिका वीणा मेश्राम म्हणाल्या,"कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शैक्षणिक वर्ष २०२०-२१ करिता अभ्यासक्रम कमी करण्याचा निर्णय स्वागतार्ह आहे. व्हर्च्युअल वर्गाद्वारे शिक्षण सूरू असताना, घेतलेला हा निर्णय योग्य आहे. ऑनलाईन शिक्षणात मोबाईल, लॅपटॉपच्या स्क्रीनसमोर विद्यार्थी किती वेळ असावेत, हा कालावधी निश्चित करून दिला आहे. त्याचा विचार करता सर्व इयत्ता आणि सर्व विषयांचा अभ्यासक्रम कमी केल्याने विद्यार्थ्यांवरील ताण कमी होण्यास मदत होणार आहे. अभ्यासक्रमाचा आकारमान कमी झाल्याने वेळेत शिकविणे पूर्ण होईल आणि चांगले शिक्षण देणे शक्य होईल."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Updates :दोन गट हातात कोयता घेऊन आमनेसामने; पोलिसांच्या तत्परतेने अनर्थ टळला

Nagpur News : ऑनलाइन बेटिंग रॅकेटचा पर्दाफाश; २० कोटींचे व्यवहा, छत्तीसगढ पोलिसांकडून नागपुरात सहा जणांना अटक

बाहुबली: द बिगिनिंगला 10 वर्षे पूर्ण झाली आहेत, आता बाहुबली: द एपिक रिलीज होणार 'या' तारखेला !

Success Story: पेंडकापारचा ‘आशीर्वाद’ चमकला शिकागोमध्ये; प्रतिकूल परिस्थितीवर केली मात बेला परिसरात कौतुक

Thane Rickshaw Driver Girl Video: भाडे नाकारले, हात उचलला, ठाण्यात रिक्षाचालकाची मुजोरी | Sakal News

SCROLL FOR NEXT