anjani mashelkar award 
पुणे

अंजनी माशेलकर पुरस्कार 'टेलीहेल्थ'ला, 'सेव्हमॉम' आणि 'डोझी' यांचाही गौरव

सकाळ वृत्तसेवा

पुणे : नवतंत्रज्ञान आणि नवकल्पना विकासासाठी दिला जाणाऱ्या अंजनी माशेलकर नवकल्पना पुरस्कारावर यंदा 'टेलीहेल्थ' स्टार्टअप्सची छाप दिसली आहे. नॉनकोविड श्रेणीमध्ये 'सेव्हमॉम', तर कोविड श्रेणीमध्ये 'डोझी' या स्टार्टअप्सला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

अंजनी माशेलकर फौंडेशनच्या वतीने दिल्या जाणाऱ्या या पुरस्कार सोहळ्याचे ऑनलाईन आयोजन करण्यात आले होते. यावेळी ज्येष्ठ शास्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर उपस्थित होते. सुशील बोर्डे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर डिजिटल पद्धतीने आरोग्यसेवा पुरविणाऱ्या स्टार्टअप्सची भूमिका या काळात महत्वपूर्ण राहिली. त्यामुळे अंजनी माशेलकर पुरस्कारावरही त्याची छाप पहायला मिळाली. 

पुण्यातील इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

असे आहेत पुरस्कारार्थीं स्टार्टअप्स 
१) सेव्हमॉम :
मदुराई येथील जिओव्हीओ स्टार्टअप्सने गरोदर महिलांच्या वैद्यकीय मदतीसाठी सेव्हमॉम हे तंत्रज्ञान विकसित केले आहे. गरोदरपणातील आरोग्यसमस्यांमुळे जगभरात शेकडो मतांचा जीव जातो. यावर उपाय म्हणून नियमित आणि रिमोट पद्धतीने गरोदर महिलेच्या आरोग्याची तपासणी करणारे डिजिटल उपकरण आणि तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे. गरोदर महिलेला एक हजार रुपयांत एक हजार दिवस नियमित आरोग्य तपासणीची सुविधा मिळणार आहे. तसेच यावर ऑनलाईन पद्धतीने विश्लेषण आणि वैद्यकीय मदत पुरविण्यात येते. विशेष म्हणजे यासाठी एक स्मार्ट संयंत्र विकसित करण्यात आले आहे.

सेव्हमॉमने आतापर्यंत 100 गावांत दोन हजाराच्यावर गरोदर महिलांना ही सुविधा उपलब्ध केली आहे. यासाठी त्यांनी सरकारसोबतही भागीदारी केली आहे. गरोदर महिलेचा रक्तदाब, साखरेचे प्रमाण, ताप, हृदयाचे ठोके आदींची नोंद घेऊन ऑनलाईन निराकरण करण्यात येते.

अभियांत्रिकीच्या पुनर्वापरातून आणि नवतंत्रज्ञानातून सामाजिक परिवर्तन शक्य आहे. डिजिटल इंडियासाठी डिजिटल हेल्थ महत्वपूर्ण आहे. कोविड काळात आणि भविष्यात ते महत्वपूर्ण भूमिका बजावणार आहे.
- डॉ. रघुनाथ माशेलकर, ज्येष्ठ शास्रज्ञ.

२) डोझी : 
कोरोनाच्या काळात देशाला दोन लाख 70 हजार आयसीयू बेडची आवश्यकता होती. आजच्या क्षमतेच्या तीन पट हा आकडा आहे. अशा वेळी डोझीने सामान्य बेडला 'सेमी आयसीयू' बेड मध्ये रूपांतरित करण्याचे नवतंत्रज्ञान बाजारात आणले. डोझीने असे तंत्रज्ञान विकसित केले आहे. जे रिमोट पद्धतीने रुग्णाच्या जीवनावश्यक शारीरिक यंत्रणांवर नियंत्रण ठेवते. बॅलिस्टोकार्डियोग्राफी (बीसीजी) वर आधारित हे तंत्रज्ञानामुळे कोरोना रुग्णाच्या अत्यावश्यक स्थितीकडे लक्ष देता येते. टॅर्टल शेल टेक्नॉलॉजी ने हे तंत्रज्ञान विकसित केले आहे. कंपनीचे मुदीत दंडवते यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT