The temple of Lord Shankar is Closed Satgaon plateau area due to corona outbreak 
पुणे

श्रावणात महादेवाची मंदिरे बंदच; ओम नम-शिवायचा जपही थांबला!

जयदीप हिरवे

सातगाव पठार : श्रावण महिन्यात गावा-गावात असलेल्या महादेवाच्या मंदिरात होणाऱ्या गर्दीवर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्बंध आले असून अनेक मंदिरे कुलूपबंद आहेत. त्यामुळे भाविकांना घरातच बसून श्रावणी सोमवार साजरा करावा लागणार असल्याने मंदिरांतील ओम नम-शिवायचा जपही थांबल्याचे दिसत आहे.

अकरावी अॅडमिशन : पहिल्या दिवशी 'इतक्या' विद्यार्थ्यांनी केले ऑनलाईन रजिस्ट्रेशन! 

हिंदु धर्मात श्रावण मासाचे अनन्य साधारण महत्व आहे. श्रावण महिना सुरू झाला की अनेक सण, उत्सवांची रेलचेल सुरू होते. या महिन्यात बहुतांशी मंदीरांमध्ये मोठ्या प्रमाणावर धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. श्रावणी सोमवारी शंकराच्या मंदिरांमध्ये दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी असते. मात्र, यावर्षी कोरोनामुळे मंदिरातील सर्व कार्यक्रम रद्द करून प्रवेश बंद करण्यात आला आहे. त्यामुळे मंदिराचे दरवाजे भाविकांसाठी बंदच आहेत. श्रावण महिन्यात भाविकांची होणारी गर्दी पाहून ही मंदिरे बंदच ठेवण्याचा निर्णय देवस्थान समितीने घेतला आहे. मंदिर कुलूपबंद असल्याने भाविकांना दर्शन घेणे दुरापास्त झाले आहे.

- कॅनॉलमध्ये वाहत चाललेल्या 'त्या' मायलेकींच्या मदतीला धावला देवदूत!​ 

सातगाव पठार (ता.आंबेगाव) भागात पेठ, भावडी रानमळा, कुरवंडी, पारगाव आदी गावांत शंकर महादेवाचे मंदिर आहे. पेठ येथील श्री वाकेश्वर मंदिरात संपूर्ण श्रावण महिन्यात अनेक कार्यक्रम साजरे केले जातात. भाविकांची रोजच चांगली गर्दी होत असते. दर श्रावणी सोमवारी अभिषेक केले जातात तर, भावडी रानमळा येथील मंदिरात देखील श्रावण महिन्यात धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.

सातगाव पठारावरील नागरीकांचे आराध्य दैवत असलेले कुरवंडी येथील श्री वेळेश्वराचे मंदिरदेखील बंदच ठेवण्यात आले आहे. या मंदिरास खूप मोठी धार्मिक व ऐतिहासिक पार्श्वभुमी आहे. या भागात वाहत असणारी वेळ नदीदेखील येथेच उगम पावते. श्रावण महिन्यात तर इथे या मंदिरात भाविकांची अक्षरक्ष ओघच चालू असतो. सातगाव पठार भागातील तसेच घोडेगाव, मंचर, राजगुरूनगर, चाकण आदी शेजारच्या गावांतील भाविक देखील इथे मोठ्या प्रमाणावर येत असतात. मात्र, आता कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मार्च महिन्यापासूनच बंद ठेवण्याचा निर्णय मंदिर व्यवस्थापनाने घेतला आहे. त्यामुळे भाविकांविना मंदिर परिसर ऐन श्रावणातही ओस पडला असून ओम नम-शिवायचा जपही थांबल्याचे दिसत आहे.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे
 क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Protest: सीजेपीच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी आले, पण घरी परतलेच नाहीत; शिवाजी पार्कात ७५ वर्षीय वृद्धाचा मृत्यू

Puttu Recipe: इडली पात्रात बनवा चविष्ट 'पुट्टू'! केरळच्या घराघरांत बनणारा पौष्टिक पदार्थ; पाहा सोपी रेसिपी...

Tembhurni Crime : गाडी पार्किंगच्या कारणावरून सुरू असलेले भांडण सोडविण्यास गेलेल्या एकाचा चाकूने भोसकून खून; दोन संशयित आरोपींना अटक

Degloor Crime : बनावट ग्राहकाच्या सापळ्यात मोटारसायकल चोर जेरबंद; १० चोरीच्या दुचाकींसह एक आरोपी ताब्यात, एक फरार

Badnapur News : ‘साहेब, शेतकऱ्यांना भरीव मदत द्या, जनावरांसाठी चारा द्या’; वरुडीतील शेतकऱ्यांची महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे आर्जवी मागणी

SCROLL FOR NEXT