tempo and car accident three killed three injured traffic police hospital  Talegaon Dhamdhere
tempo and car accident three killed three injured traffic police hospital Talegaon Dhamdhere esakal
पुणे

Accident News : न्हावरा राष्ट्रीय महामार्गावर अपघात; तीन ठार, तीन जखमी

नागनाथ शिंगाडे

तळेगाव ढमढेरे : तळेगाव ढमढेरे - न्हावरा (ता.शिरूर) या राष्ट्रीय महामार्गावर तोडकर वस्ती येथे पिकप (टेम्पो) आणि कारच्या भीषण अपघातात तिघांचा मृत्यू आणि तीन जण जखमी झाले आहेत अशी माहिती शिक्रापूर पोलिसांनी दिली.

रविवारी सायंकाळच्या सुमारास भरधाव पिकपने (एम. एच. १६, सी.डी. ४७४२) व कारला (एम. एच. १२, एस. यु. ५६५९) धडक दिल्याने भीषण अपघात झाला. सर्व जखमींना शिक्रापूर येथील खाजगी दवाखान्यात उपचारासाठी नेले असता त्यातील तिघेजण मृत्यू पावल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

यामध्ये कार मधील सौ. अनिता राजू बोरुडे (वय ४०), सौ. योगिता सुनील बोरुडे (वय ४०) व राजू अशोक शिंदे (वय २५, सर्वजण मूळ राहणार कात्राबाज मांडवगण, ता. श्रीगोंदा) या तिघांचा अपघातात मृत्यू झाला आहे. तर कुमारी किशोरी सुनील बोरुडे (वय १७) ही जखमी झाली आहे. तसेच पिकप मधील चालक श्रीराम बापू मांडे व धीरज कांतीलाल लोखंडे (रा. बेलवंडी कोठार, ता. श्रीगोंदा) हे जखमी झाले आहेत.

जखमींवर शिक्रापूर येथील हॉस्पिटलमध्ये उपचार चालू आहेत. पिकप चालक श्रीराम बापू मांडे (रा. बेलवंडी कोठार, ता. श्रीगोंदा) यांचे विरुद्ध अविनाश निवृत्ती बोरुडे यांनी रात्री उशिरा शिक्रापूर पोलीस स्टेशन मध्ये फिर्याद दिली आहे. पुढील तपास शिक्रापूर पोलीस करीत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident News: पुण्यातील हिट अँण्ड रनप्रकरणी पोलिसाचं निलंबन? गृहमंत्र्याचे कठोर कारवाईचे आदेश; हे आहे कारण

Pune Accident Updates : 'त्या' अल्पवयीन आरोपीचा अपघातापूर्वीचा पबमधला व्हिडीओ आला समोर; पब चालकासह इतरांवर गुन्हे दाखल

Nepal PM Pushpa Kamal Dahal : नेपाळच्या पंतप्रधानांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात ३ वाजेपर्यंत फक्त ३६.०७ टक्के मतदान, सर्वाधिक मतदान कुठे?

Randeep Hooda: 'स्वातंत्र्य वीर सावरकर' ओटीटीवर होणार रिलीज; कधी आणि कोणत्या प्लॅटफॉर्मवर पाहता येणार चित्रपट? जाणून घ्या...

SCROLL FOR NEXT