khadakwasla.jpg 
पुणे

खडकवासला बायपासवरील तात्पुरता तयार केलेला पूल जोरदार पावसामुळे गेला वाहून

निलेश बोरुडे

किरकटवाडी (पुणे) : खडकवासला बायपास रस्त्याचे काम कित्येक दिवस रखडल्यानंतर तात्पुरता पर्याय म्हणून खडकवासला ग्रामपंचायतीने सिमेंट पाईप व मुरूम टाकून नागरिकांच्या सोयीसाठी तयार केलेला पूल काल ( दि. 5 सप्टेंबर) झालेल्या जोरदार पावसामुळे वाहून गेला आहे. रस्त्याच्या कामाला विलंब लावणाऱ्या ठेकेदाराला पाठीशी घालणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांचे फोन मात्र नॉट रिचेबल येत आहेत.
         

मागील वर्षी 25 सप्टेंबर 2019 रोजी खडकवासला व आजूबाजूच्या परिसरात झालेल्या जोरदार पावसाने खडकवासला बायपास रस्त्यावरील पुलाचा मातीचा भराव वाहून गेला होता. पूल व्यवस्थित असल्याने त्यावरून वाहनांची ये-जा सुरू होती. बायपास रस्त्याचे काम सुरू केल्यानंतर ठेकेदाराने जुना पूल पूर्णपणे तोडला. पुल तोडल्यानंतर लवकर काम पूर्ण होईल अशी नागरिकांची अपेक्षा होती; परंतु वर्ष होत आले तरी रस्त्यासह पुलाचेही काम रखडलेले‌ आहे.

 ठेकेदाराने पुल तोडल्यानंतर नागरिकांची मोठी गैरसोय होऊ लागली. खडकवासला ग्रामपंचायतीने नागरिकांच्या सोयीसाठी तात्पुरता उपाय म्हणून ओढ्यामध्ये सिमेंट पाईप टाकले व त्यावर मुरूम टाकून तात्पुरता पर्यायी रस्ता सुरू केला. मात्र काल झालेल्या जोरदार पावसामुळे तयार केलेला पर्यायी रस्ता पुन्हा वाहून गेला आहे. बायपास रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांची यामुळे मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

लेखी आश्वासनाचे झाले काय?
मुख्य रस्त्यासह खडकवासला बायपास रस्त्याचे काम रखडल्यानंतर खडकवासला ग्रामस्थांनी 18 जानेवारी 2020 रोजी 'रास्ता रोको' आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यावेळी रोडवेज सोल्यूशन या रस्त्याचे काम करणाऱ्या कंपनीच्या वतीने खडकवासला ग्रामस्थांना रस्त्याचे काम पूर्ण होईपर्यंत मशिनरी हलवणार नाही असे लेखी आश्वासन दिले होते; मात्र तरीदेखील रस्त्याचे काम झाले नाही व एकेक करून कामासाठी आलेल्या मशिनरीही गायब झाल्या. यावरून संबंधित ठेकेदार सार्वजनिक बांधकाम विभागासह स्थानिक नागरिकांचीही फसवणूक करत असल्याचे दिसून येत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता ज्ञानेश्वर राठोड व अतिरिक्त अभियंता अश्विनी भुजबळ यांच्याशी या वाहून गेलेल्या पुलाबाबत व रखडलेल्या कामाबाबत संपर्क करण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांचा फोन नॉट रिचेबल येत आहे.

"तात्पुरता पूल वाहून गेल्यानंतर रात्रीपासूनच अधिकार्‍यांशी संपर्क करण्याचा प्रयत्न करत आहे; परंतु अधिकारी फोनला उत्तर देत नाहीत. रात्रीचा अपघात होऊ नये म्हणून तातडीने संबंधित ठेकेदाराकडून पुलाच्या दोन्ही बाजूला बॅरिकेड्स लावून घेतले. रस्त्याचे काम रखडल्यामुळे नागरिकांमध्ये खूप संतापाची भावना आहे. लवकरच तीव्र स्वरूपात आंदोलन करण्यात येणार आहे." सौरभ मते, सरपंच , खडकवासला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video Viral: विराटनं आधी SRH च्या गोलंदाजांना चोपलं अन् मग मॅच जिंकून बायकोला फ्लाइंग किस दिलं; अनुष्काची रिअ‍ॅक्शन व्हायरल

Solapur Zilla Parishad: सोलापूर जिल्हा परिषद राज्यात आदर्श;‘सेवाकर्मी’त उत्कृष्ट कामगिरी, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सीईओंचा गौरव!

Yavatmal News: शेतकर्!यांना थकबाकी वसुलीचा ‘शॉक’; महावितरण करणार कारवाई; ९५ कोटी रुपयांची वीजबिल थकले

Mohol Bribery Case: ३३ हजारांच्या लाचप्रकरणी तलाठी रंगेहाथ जेरबंद; मोहोळ तालुक्यातील महसूल विभागात खळबळ, अवैध मुरूम उपसा अन्..

Hingoli News: सेलु तालुक्यात यंदा ज्वारीचे उत्पादन घटणार; ज्वारीचा दर साडेचार ते पाच हजारांवर; प्रतिकूल हवामानामुळे परिणामाची चिन्हे

SCROLL FOR NEXT