ten lakh animals will be vaccinated for lalya khurkhut dieses in the district from today 
पुणे

जिल्ह्यात १० लाख जनावरांना लाळ्या खुरकूत लस आजपासून देणार; कानात मारणार बारकोडचा बिल्ला

सकाळवृत्तसेवा

पुणे : जिल्ह्यातील १० लाख जनावरांना येत्या १५ ऑक्टोबरपर्यंत लाळ खुरकत प्रतिबंधात्मक लस दिली जाणार आहे. लसीकरण झालेल्या जनावरांच्या कानात बारकोडचा बिल्ला मारला जाणार आहे. हा बिल्ला नसलेल्या जनावरांची खरेदी-विक्री करता येणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपापल्या मालकीच्या सर्व जनावरांना ही लस द्यावी, असे आवाहन जिल्हा परिषदेचे कृषी सभापती बाबुराव वायकर यांनी केले आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

जिल्हा परिषदेच्या पशूसंवर्धन विभागाच्यावतीने राष्ट्रीय पशुरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हयात लाळ्या खुरकूत रोग प्रतिबंधक  लसीकरण मोहिम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेचे उद्घघाटन शनिवारी (ता. १९) वायकर यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी वडगाव मावळ  येथील शेतकरी सुनील दंडेल यांच्या गाईला सभापती वायकर यांच्या हस्ते ही लस देण्यात आली. यावेळी जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. शिवाजी विधाटे, विशाल वहिले, सुनील दंडेल,भाऊसाहेब ढोरे, सुनील चव्हाण,सुजित माझिरे, अक्षय रौधळ आदी उपस्थित होते.

लाळ्या खुरकत हा विषाणूजन्य आजार आहे. यामुळे गाई- म्हशींची दूध उत्पादन क्षमता घटते. बैलास हा आजार झाल्यास त्यांचे खुरे निकामी होतात.यामुळे शेतकऱ्यांचे मोठे  आर्थिक नुकसान होते, असे डॉ. विधाटे यांनी सांगितले.

'लाळ्या खुरकत'ची लक्षणे 

- जनावरांना ताप येतो.

- सातत्याने लाळ गळते.

- खुरांना जखमा होतात.

- जनावरांना श्वास घेण्यास त्रास होतो.

- प्रसंगी गाई-म्हशीचा गर्भपात होऊ शकतो.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Privatization: 'ही' सरकारी बँक होणार खासगी! कधीही घोषणा होण्याची शक्यता, निर्णय अंतिम टप्प्यात

"कोण हिंदू? कोण मुस्लिम?" धर्माच्या भिंती ओलांडून 'बाप्पा' पाकिस्तानात! मूर्ती घडवतानाचा व्हिडिओ होतोय व्हायरल; Viral Video

रितेश देशमुखने पापाराझीकडून चक्क १०० रुपये उधार घेतले, पण का? अभिनेत्याने सांगितलं रस्त्यावर काय घडलं, म्हणाला-

Duleep Trophy Final: कर्णधार ईशान किशन पुन्हा चमकला, पण शतक थोडक्यात हुकलं; पडिक्कलनं घेतला शानदार कॅच; Video

Baramati Crime : बारामतीत छळाला कंटाळून विवाहितेने संपविले जीवन; पती व सासूविरुद्ध गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT