पुणे

पुणे : भाजप सरकारमुळे रिंगरोड प्रकल्प खर्चात 10 हजार कोटींची वाढ : अजित पवार

सकाळ वृत्तसेवा

पुणे : पुण्यातील मेट्रो प्रकल्पाला गेल्या दोन वर्षात भाजप
सरकारने एक रुपयाचाही निधी दिला नाही. शिवाय रिंगरोड प्रकल्पासही मोठा विलंब केला. यामुळे रिंगरोड प्रकल्प खर्चात तब्बल 10 हजार कोटी रुपयांची वाढ झाली आहे. याला भाजप सरकार जबाबदार असल्याचा आरोप राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी (ता.10) पुण्यात एका कार्यक्रमात बोलताना केला.

पुणे जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी पदासाठी इच्छुक असलेल्या सदस्यांच्या मुलाखती घेण्यासाठी पवार शुक्रवारी पुण्यात आले होते. यावेळी त्यांनी लष्कर भागातील जिल्हा परिषद अध्यक्षांच्या सरकारी बंगल्यात या मुलाखती घेतल्या. यावेळी जिल्हा परिषद पदाधिकारी आणि सदस्यांना मार्गदर्शन करताना
ते बोलत होते. यावेळी कामगारमंत्री दिलीप वळसे पाटील, बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे, जिल्हा परिषद अध्यक्ष विश्‍वास देवकाते आदी उपस्थित होते.

पवार म्हणाले, "2014 मध्ये मी उपमुख्यमंत्रिपद सोडण्यापूर्वीच तत्कालीन सरकारने रिंगरोड हा प्रकल्प मंजूर केला. तेव्हा या प्रकल्पाची एकूण किंमत सुमारे 14 हजार कोटी रुपये इतकी होती. ती आता 24 हजार कोटींवर गेली आहे. परिणामी या प्रकल्प खर्चात 10 हजार कोटींची वाढ झाली आहे.''

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Schedule : १४ वन डे, १६ ट्वेंटी-२० अन् ७ कसोटी! IPL 2027 पर्यत टीम इंडियाचं वेळापत्रक; विराट, रोहितच्या फॅनसाठी मेजवानी

FDA: एफडीएचा दणका! IRCTCचे बेस किचन आणि इस्कॉनमध्ये धडक कारवाई, कॅटरर्सचे परवाने थेट निलंबित

तेजश्री प्रधान जर ८० च्या दशकातील हिरोईन असती तर... पाहा झक्कास फोटो, तुम्हीही सहज बनवू शकता

Marathi News Live Updates : पुण्यात एमपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांने उचलले टोकाचं पाऊल

वीज गेली, मेणबत्तीच्या उजेडात रुग्णावर उपचार करण्याची वेळ; सरकारी रुग्णालयातला धक्कादायक प्रकार, VIDEO VIRAL

SCROLL FOR NEXT