Ten thousand rupees help to the police if infected with corona in pune 
पुणे

Coronavirus : पुणे पोलिसांबाबत मोठी घोषणा; कोरोना योद्ध्यांना मिळणार १० हजार रुपयांची मदत

सकाळवृत्तसेवा

पुणे : कोरोनाचे संसर्ग कमी करण्यासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी ड्युटीवर असताना दुर्दैवाने एखाद्या पोलिसास कोरोनाची लागण झाल्यास त्याला दहा हजार रुपयांची मदत दिली जाणार आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी जीवावर उदार होऊन बंदोबस्तात काम करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांसाठी त्यांनी केल्या कामाबद्दल हा 'रिवार्ड' दिला जाणार आहे. मदतीची रक्कम पोलिस कल्याण निधीतून त्यांच्या खात्यात वर्ग केली जाईल. तर आगाऊ रक्कम म्हणून एक लाख रुपये संबंधीत पोलिसांना बिगरव्याजी दिले जाणार आहे, अशी माहिती सह पोलिस आयुक्त डाॅ. रविंद्र शिसवे यांनी दिली. आत्तापर्यंत शहर पोलिस दलातील आठ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्या सर्वांना ही रक्कम दिली जाणार आहे. याबाबत अधिक माहिती देताना डॉ. शिसवे यांनी सांगितले.

ब्रिटिश काळातही पुण्यातल्या पेठा रिकाम्या केल्या होत्या; वाचा इंटरेस्टिंग इतिहास

कोरोना संकटाच्या काळात पोलिस लाॅकडाऊनची अंमलबजावणी करत आहेत. कर्तव्य पार पाडताना पोलिस कर्मचाऱ्यांचा कोरोनाबाधितांशी अनेकदा संपर्क येतो. त्यावेळी योग्य ती काळजी घेतली जाते आहे. मात्र तरी देखील दुर्दैवाने काही पोलिस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे दिसून आले आहे. या कर्मचाऱ्यांना तात्काळ योग्य ते उपचार मिळावेत म्हणून शहरातील काही रुग्णालयात पोलिसांसाठी बेड आरक्षित करण्यात आले आहेत. यापुढे जर दुर्दैवाने एखाद्या कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाली तर काैटूंबाचा एक घटक म्हणून, एक पोलिसांची टीम कर्मचाऱ्याला स्क्रिनींगसाठी घेऊन जाईल व योग्य उपचार कसे मिळतील यावर लक्ष ठेवेल. सर्वात महत्वाचे धोरण हे आहे की, कर्तव्य पार पाडत असताना पोलिसांना कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये. तो टाळण्यासाठी सर्व प्रकारच्या प्रतिबंधात्मक उपायोजना करण्यात येत आहे.

#Lockdown2.0 : लॉकडाऊनचा सर्वाधिक फायदा 'या' विभागाला; वाचा सविस्तर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Niger Airport Attack : आंतरराष्ट्रीय विमानतळावर दहशतवादी हल्ला; ११ सैनिकांसह ३५ जण ठार; सुरक्षा दलाकडून २२ दहशतवाद्यांना कंठस्नान

Yeola Bribery Case : 60 हजार घेऊनही पोट भरले नाही! येवल्यात मुख्य लिपिक सुधीर वाघ लाचलुचपतच्या जाळ्यात, 5 हजार घेताना अटक, सावकारी परवान्यासाठी मागितली लाच

Viral Video: 'माझ्या गालावर पप्पी दे...' ; परदेशी पर्यटकाला रस्त्यात अडवलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद

'वेलकम टू द जंगल'सिनेमातील 'हे' गाणं ऐकलं का? अमृता फडणवीस यांच्या आवाजाची चर्चा; नेटकरी म्हणाले...

Solapur Water Crisis: उजनी धरणात उणे २४.३७% पाणीसाठा, साेलापूर जिल्ह्यातील ४४ तलाव कोरडे

SCROLL FOR NEXT