Path_Vendor 
पुणे

पथ विक्रेते बनणार आत्मनिर्भर; विनातारण मिळणार १० हजारांचं कर्ज!

सकाळ वृत्तसेवा

पुणे : शहरातील पथ विक्रेत्यांना व्यवसाय सुरू करण्यासाठी विनातारण दहा हजार रुपयांचे कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पथविक्रेत्यांनी केंद्र सरकारच्या पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले आहे. 

कोरोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर लॉकडाऊनमुळे पथविक्रेते आणि फेरीवाले यांच्या उपजीविकेवर विपरीत परिणाम झाला आहे. त्यामुळे पथविक्रेत्यांना त्यांचा व्यवसाय पुन्हा सुरू करण्यासाठी खेळत्या भांडवलाचा पतपुरवठा करण्याची आवश्‍यकता आहे. यासाठी केंद्र सरकार पुरस्कृत पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजनेअंतर्गत पथविक्रेत्यांसाठी पतपुरवठा योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. दहा हजार रुपयांपर्यंतचे खेळते भांडवली कर्ज उपलब्ध करणे, नियमित परतफेडीसाठी प्रोत्साहन आणि डिजिटल व्यवहारास प्रोत्साहन देणे हा योजनेचा उद्देश आहे. 

या योजनेसाठी 24 मार्च 2020 आणि त्यापूर्वी शहरातील पथविक्रेते पात्र असतील. या योजनेत एक वर्षांच्या परतफेड मुदतीसह दहा हजार रुपयापर्यंतचे खेळते भांडवल कर्ज उपलब्ध करून देण्यात येईल. कर्जपुरवठा करणारी बॅंक अथवा संस्था कोणत्याही प्रकारचे तारण घेणार नाही. मुदतीत परतफेड केल्यास पथविक्रेते पुढील खेळते भांडवलाच्या कर्जासाठी पात्र असतील. याबाबत व्याजदर रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार असतील.

लाभार्थ्यांनी मुदतीत कर्ज परतफेड केल्यास सात टक्के व्याज अनुदान मिळण्यास पात्र असतील. डिजिटल व्यवहार करणाऱ्या विक्रेत्यांना 50 ते 100 रुपये मासिक कॅशबॅक मिळेल. या योजनेसाठी महापालिका आयुक्त, नगरपरिषद आणि नगरपंचायत क्षेत्रासाठी मुख्याधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे. पात्र लाभार्थ्यांनी संबंधित महापालिका, नगरपालिकेत संपर्क साधून आवश्‍यक कागदपत्रांसह अर्ज दाखल करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी केले आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur News: युद्धाच्या झळांनी ग्रामीण भाग होरपळतोय; डिझेलअभावी शेतीकामात अडथळा: पेट्रोल पंपावर वाहनधारकांनी गर्दी

Supreme Court: सुट्टीवर कोर्टाचा मोठा निर्णय! धार्मिक स्वातंत्र्याला मर्यादा, देशभर सुट्टीची मागणी फेटाळली

Washim News: महामार्गांवरील वृक्षतोडीला थांबवा; शहरातील नागरिकांची न्यायालयात धाव; शंभर वर्ष जुन्या वृक्षावार घाला

Qamar Javed Bajwa Passed Away : पाकिस्तानच्या माजी लष्करप्रमुखांचा बाथरुममध्ये घसरुन मृत्यू, मेंदूला गंभीर दुखापत अन्...

Akola News: दारूच्या नशेत मित्रांनीच मित्राला संपवले; रिधोरा शिवारातील खुनाचा छडा उलगडला; दोन आरोपींना ठोकल्या बेड्या

SCROLL FOR NEXT