पुणे

कोकणातील पूरग्रस्तांसाठी जीवनावश्यक वस्तूंच्या दहा हजार किट रवाना

सकाळ वृत्तसेवा

मांडवगण फराटा : कोकणातील पूरग्रस्तांसाठी एक हात मदतीचा या संकल्पनेतून राव लक्ष्मी फाउंडेशन आणि शिरूर-हवेली चे आमदार अशोक पवार यांच्या माध्यमातून विविध प्रकारच्या ४९ जीवनावश्यक वस्तूंच्या दहा हजार किट २७ गाड्यांमधून कोकणातील चिपळूण आणि रोहा या ठिकाणी पाठवण्यात आल्या. राव लक्ष्मी फाउंडेशनच्या माध्यमातून शिरूर-हवेलीचे आमदार अशोक पवार व त्यांच्या पत्नी पुणे जिल्हा परिषदेच्या कृषी आणि पशुसंवर्धन विभागाच्या माजी सभापती सुजाता पवार यांनी शिरूर-हवेलीतील जनतेला पूरग्रस्तांना मदत करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला भरभरून प्रतिसाद देत मदत करण्यात आली आहे. या मदतीतून संसारोपयोगी आणि जीवनावश्यक ४९ वस्तूंचे पॅकिंग करण्यात आले. यात रोजच्या वापरात लागणाऱ्या भांड्यांसह किराणा, कपडे तसेच रक्षाबंधन निमित्त राख्या अशा वस्तूंच्या किट तयार करून त्या कोकणातील चिपळूण आणि रोहा येथील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पाठवण्यात आल्या आहेत.

रावलक्ष्मी फौंडेशनच्या माध्यमातून पूरग्रस्तांसाठी आमदार अशोक पवार आणि जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन विभागाच्या माजी सभापती सुजाता पवार यांनी मदत करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनास प्रतिसाद देत शिरूर-हवेली मतदार संघातील अनेक गावांच्या वतीने मोठ्या प्रमाणात मदत गोळा करण्यात आली होती. या सर्व जमा झालेल्या मदतीमधून सुमारे दहा हजार किट तयार करण्यात आली होती.

गेल्या दहा दिवसांपासून हे किट तयार करण्यासाठी आमदार अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुजाता पवार यांच्यासह या परिसरातील शेकडो कार्यकर्ते अहोरात्र मेहनत घेत होते. गेल्या दहा दिवसांपासून पूरग्रस्तांसाठी मदत गोळा करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू होते. पवार दाम्पत्यानं पूरग्रस्तांच्या मदतीवर पूर्णपणे लक्ष केंद्रित केलं होते. सुजाता पवार यांनी तर अक्षरशः झपाटून काम केले. कोरोनाच्या दुसर्‍या लाटेतही त्यांनी अशाच प्रकारे काम केले होते. पूरग्रस्तांसाठी ही त्या पुढे आल्या. मदत गोळा केली आणि तशीच पाठवली असं नाही. गोळा केलेली मदत एका जागेवर जमा केली. प्रत्येक वस्तू वेगळ्या केल्या. खाद्य पदार्थ, भांडी, कपडे, चटई, ब्लॅंकेट, साड्या, बकेट व इतर वस्तुंचे व्यवस्थित पॅकिंग करण्यात आले.

याबाबत बोलताना आमदार अशोक पवार म्हणाले की "राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने सर्व कार्यकर्ते पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे सरसावले आहेत. चिपळून आणि रोहा येथील सर्वाधिक नुकसान झालेल्या गावांमध्ये अनेकांचे प्राण गेले, अनेक जण बेघर झाले आहेत. त्यांना मदतीची गरज आहे हे ओळखून सुमारे दहा हजार किट्स शिरूर-हवेली च्या आम जनतेच्या वतीने आणि राव लक्ष्मी फाउंडेशन शिरूर च्या वतीने पाठवीत आहोत. ही मदत शिरूर हवेली मतदार संघातील सर्वसामान्य जनतेने, उद्योगपतींनी, शेतकऱ्यांनी, कामगारांनी, मजुरांनी केली आहे. मी त्या सर्वांचे मनापासून आभार मानतो."

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arjun Tendulkar MI vs LSG : हंगामातील पहिल्याच सामन्यात अर्जुन झाला रिटायर्ड हर्ट, षटकही नाही केलं पूर्ण

MI vs LSG Live Score IPL 2024 : दमदार सुरूवातीनंतर मुंबईला हादरे; रोहितही झाला बाद

Raj Thackeray: ओवैसीसारख्यांचे अड्डे उध्वस्त करा; राज ठाकरेंचं महायुतीच्या जाहीर सभेत मोदींना साकडं

Lok Sabha Election 2024 : धुळ्यात भाजपचा गड कोसळणार? जाणून घ्या कसं असेल विजयाचं गणित

Climate Change On Malaria :  मलेरिया डासांच्या वाढीवर क्लायमेट चेंजचा थेट परिणाम होतोय, WHO ने दिला धोक्याचा इशारा

SCROLL FOR NEXT