TET Team eSakal
पुणे

TET Scam : आत्मविश्वासाचा अभाव; गुणवत्ता असूनही 21 शिक्षकांनी भरले पैसे

परीक्षा पास होण्यासाठी शिक्षकांनीच केली 'चिटींग'

सुधीर काकडे

पुणे : शिक्षक पात्रता परीक्षा घोटाळा (TET Exam Scam) प्रकरणात अनेक धक्कादाय गोष्टी समोर येत आहेत. आतापर्यंत या प्रकरणात अनेक मोठे मासे पोलिसांच्या (Pune Police) गळाला लागले असून, आता आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. स्वत:वर विश्वास नसल्यानं अनेक उमेदवारांनी टीईटी परीक्षा पास होण्यासाठी पैसे देण्याचं काम केलं असल्याचं समोर आलं आहे. विशेष म्हणजे पैसे भरलेल्यांंपैकी अनेकजण पास झालेले उमेदवार आहेत. अशा एकून 21 शिक्षकांनी पैसे भरल्याचं समोर आलं आहे.

टीईटी परीक्षेत अशा पद्धतीनं निकाल मिळवत अनेक जण पास झाले असून, ते सेवेत असल्याचं समजतंय. पात्र झालेल्यांपैकी किती जण सध्या कार्यरत आहेत याची माहिती गोळा करण्यात येत आहे. टीईटी मध्ये तब्बल 7 हजार 880 अपात्र परिक्षार्थींना पैसे घेऊन पात्र केलं असल्याचं समोर आलं आहे. OMR शीट ची तपासणी केली असताना 21 शिक्षक त्यांच्या गुणवत्तेवर पास झाल्याचे आढळून आलं.

मात्र, परीक्षेत पास होऊ की नाही याबाबत खात्री नसल्यानं या 21 शिक्षकांनी पात्र होण्यासाठी पैसे दिले होते. त्यामुळे अपात्र शिक्षकांच्या यादीतून या 21 शिक्षकांची नावं काढून टाकण्यात आली आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

आजचे राशिभविष्य - 17 मे 2026

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 16 मे 2026

New Marathi Books Review : वाचनीय आणि संग्रहणीय! अध्यात्मापासून ते पर्यटनाच्या अनुभूतीपर्यंत, नव्या पुस्तकांची रंजक सफर

साप्ताहिक राशिभविष्य : (१७ मे २०२६ ते २३ मे २०२६)

SCROLL FOR NEXT