Amitabh Gupta Google
पुणे

TET परीक्षा प्रकरणात कोट्यवधींची उलाढाल; पुणे पोलिसांचा खुलासा

पुणे पोलिसांनी जप्त केले ९० लाख

सुधीर काकडे

पुणे: शासकिय सेवेत भविष्याची स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणाऱ्या पेपर घोटाळ्यातील आरोपींच्या मुस्क्या आवळायला पोलिसांनी सुरूवात केली आहे. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (Amitabh Gupta) यांनी टीईटी परिक्षेतील (TET Exam) गैरव्यवहाराप्रकरणी केलेल्या कारवाईबद्दल माहिती दिली. आता पर्यंत या प्रकरणात २ लोकांना अटक करण्यात आली असून, आरोपींकडून ९० लाख जप्त केल्याचं सांगितलं आहे. या प्रकरणात ४ कोटींपर्यंत गैरव्यवहार झाल्याचं समजतं आहे.

उमेदवारांकडून ३५ हजार ते १ लाख रुपयांपर्यंत पैसे घेतले जात होते. या प्रकरणात अटक केलेल्या आरोपींकडून पोलिसांनी 88 लाख रुपये रोख आणि सोनं जप्त केलं आहे. या प्रकरणात आरोपींनी जवळपास साडेचार कोटी रुपये जमा केले असल्याचं समजतं आहे. ऑक्टोबरमध्ये परीक्षा झाली होती. चार ते पाच जणांची लिंक लागली असून, प्राथमिक तपासातून या गोष्टी समोर आलं असल्याचं अमिताभ गुप्ता यांनी सांगितलं आहे.

पोलिसांनी जप्त केलेली रक्कम आणि सोनं

दोन पेपर फुटी प्रकरणांचा तपास करताना म्हाडा पेपर फुटीची लिंक सापडली. त्यातूनही काही लोकांना अटक केली. त्यात टीईटी च्या परीक्षेत घोटाळा असल्याचं समोर आलं. या प्रकरणात गुन्हा दाखल करून तुकाराम सुपे यांना अटक केली. या प्रकरणी राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष दत्तात्रय जगताप यांनी फिर्याद दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local Train : मुंबईकरांसाठी खुशखबर! मध्य रेल्वेवर १५ डब्यांच्या लोकलच्या आणखी १० फेऱ्या, १२ डब्यांच्या लोकलचे १५ डब्यांत रूपांतर

FDA Crime : पुणे शहरातील प्रसिद्ध गोल्‍डन बेकरीसह दहा बेकरी, रेस्टॉरंटचे परवाने निलंबित; अस्वच्छतेप्रकरणी एफडीएची कारवाई

Garfield Sobers: क्रिकेटच्या इतिहासातील महान ऑलराउंडर काळाच्या पडद्याआड! गॅरी सोबर्स यांचं निधन; क्रीडाजगत शोकसागरात

Pune News : जप्त गुळाचे करायचे काय? गूळ उत्पादकांचा सवाल, जवळपास ४०० गुऱ्हाळांवर परिणाम

Amritsar Express: अमृतसर एक्स्प्रेसच्या डब्याखाली सापडला मानवी पाय; सीएसएमटी रेल्वे यार्डमधील घटना, रेल्वे पोलिसांना वेगळाच संशय

SCROLL FOR NEXT