Kirit-Somaiya sakal media
पुणे

ठाकरे सरकारने सामान्य जनतेचा केला विश्वासघात; किरीट सोमय्या

मराठा, ओबीसी आरक्षणाबाबत जनतेची फसवणूक करणा-या ठाकरे सरकारने कोवीड काळात सामान्य जनतेचा विश्वासघात केला आहे.

नितीन बारवकर

शिरूर - मराठा, ओबीसी आरक्षणाबाबत जनतेची फसवणूक करणा-या ठाकरे सरकारने कोवीड काळात सामान्य जनतेचा विश्वासघात केला आहे. केवळ पैसे गोळा करण्यासाठी व भ्रष्टाचारासाठी स्थापन झालेल्या महाविकास आघाडी सरकारपासून राज्यातील जनतेची मुक्तता करण्याचा निर्धार भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते किरीट सोमय्या यांनी येथे व्यक्त केला.

२१ महिन्यांत केवळ फसवणूक, भ्रष्टाचार, घोटाळे करणा-या या 'अलिबाबा चाळीस चोर' च्या सरकारने सुरू केलेल्या लूटमारीमुळे महाराष्ट्र बुडत चालला असून, घोटाळेबाजांना मार्गी लावून महाराष्ट्राला वाचविणे हे मुख्य लक्ष्य असल्याचे सोमय्या यांनी येथे पत्रकार परिषदेत सांगितले. माजी मंत्री बाळा भेगडे, भाजपचे जिल्हा सरचिटणीस ॲड. धर्मेंद्र खांडरे, तालुकाध्यक्ष दादा पाटील फराटे, शहर अध्यक्ष नितीन पाचर्णे यावेळी उपस्थित होते. आगामी महापालिका निवडणूका कशाही प्रभाग पद्धतीने घेतल्या तरी भाजपची त्यांना सामोरे जाण्याची पूर्ण तयारी आहे आणि त्या निवडणूका भाजप यशस्वी करून दाखवेल, असा आशावाद सोमय्या यांनी व्यक्त केला. आरक्षण असेल, प्रभाग पद्धती असेल याबाबतची बनवाबनवी, फसवाफसवी थांबवून ठाकरे सरकारने निवडणूका घ्याव्यात, असे ते म्हणाले.

ओबीसी आरक्षण, कोवीडची लढाई या सर्व विषयाबाबत मोदी सरकारकडे बोट दाखवणारांनी घरी बसावे, अशी टीपण्णी सोमय्या यांनी केली. ते म्हणाले, ओबीसी आरक्षणाबाबतची सर्व वस्तुस्थिती ज्येष्ठ नेते शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना चांगल्या पद्धतीने माहिती आहे. अधिकारी वर्गाने याबाबतची सर्व वस्तूस्थिती त्यांच्यासमोर मांडली आहे. तरीदेखील नौटंकी चालू आहे. सत्ताधारी या विषयात जनतेशी गद्दारी करीत आहेत. ओबीसी व मराठा आरक्षणाची कमिटमेंट पूर्ण झाली पाहिजे. प्रत्येक बाबतीत केंद्राकडे बोट दाखवून उपयोग नाही. राज्य सरकारची जबाबदारी महत्वाची आहे.

मंत्री अनिल परब यांनी अब्रुनूकसानीचा दावा दाखल केला असल्याबाबत छेडले असता, त्याला मी महत्व देत नाही, असे सोमय्या म्हणाले. परब यांच्या दापोली येथील समुद्रकिनारी उभ्या असलेल्या बंगल्याचे काम अनधिकृत असल्यानेच ठाकरे सरकारने त्यांना नोटीस बजावली होती. तो तोडण्याचे आदेश खरे की खोटे हे परब यांनी सांगावे. त्यांचे रिसॉर्ट बेकायदेशीर असल्याचे प्रतिज्ञापत्र शासनाने दिले आहे. मिलिंद नार्वेकर यांचा अनधिकृत बंगला राज्य शासनानेच तोडला आहे. त्यामुळे आपले घोटाळे झाकून ठेवताना महाराष्ट्रातील जनतेचे लक्ष इतरत्र विचलित करण्याचे सत्ताधा-यांनी थांबवावे, असे आवाहन त्यांनी केले.

ठाकरे सरकारच्या काळातील कोवीड घोटाळ्यामुळेच सर्वाधिक मृत्यु झाल्याचा घणाघाती आरोप सोमय्या यांनी केला. माझे किंवा भाजपच्या नेते, मंत्र्यांचे काही घोटाळे असतील, तर तुम्ही चौकशी करा ना, तुम्हाला कुणी अडवले आहे का. शेवटी कुणीही भ्रष्टाचार केला असेल तर त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे, हीच आमची भूमिका आहे, असेही ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dog Attack: बीडमध्ये धक्कादायक घटना! मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात सहा वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी अंत

गोदाघाटावर अघोरी पूजा, महिलेसोबत विचित्र प्रकार; १ लाख ६० हजारांची फसवणूक अन् २१ वर्षीय मुलीचा बळजबरीने साखरपुडा

Akola Drought : अकोल्यात खारपाणपट्ट्यात सप्टेंबरअखेरच दुष्काळाची दाहकता! महिनाभरातून एकदा नळाला पाणी; टाक्यांमध्ये साठवलेले पाणी आरोग्यास घातक

Mumbai News: हॉटेलमध्ये डोशात मृत उंदीर सापडला; ग्राहकाला उलट्या; मुंबईतील किळसवाणा प्रकार!

Marathi News Live Updates: दुष्काळाची तीव्रता पाहता चारा छावण्या सुरू करण्याचे आमदार बंब यांचे आश्वासन

SCROLL FOR NEXT