Pune Municipal Sakal
पुणे

साडेसतरानळी आकाशवाणी प्रभागाला हवे आहे विकासाची दिशा असणारे नेतृत्व

आघाडी झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेससाठी हा प्रश्न जटील होणार आहे

कृष्णकांत कोबल

हडपसर: चार वर्षापूर्वी पालिकेत समाविष्ट झालेल्या ११ गावांपैकी संपूर्ण साडेसतरानळी व केशवनगरचा काही भाग तसेच जुन्या हद्दीतील प्रभाग क्रमांक २२ मधील आकाशवाणी पंधरानंबर परिसर व नव्याने पालिकेत समाविष्ट झालेल्या मांजरी ग्रामपंचायतमधील महादेवनगर अशी जुन्या नव्याची जुळवाजुळव करीत साडेसतरानळी आकाशवाणी या प्रभाग क्रमांक २४ ची निर्मिती झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस व भारतीय जनता पार्टीचे संमिश्र नेतृत्व अनुभवलेल्या येथील नागरिकांना आजपर्यंत प्राथमिक सुविधांची केवळ प्रतीक्षाच करावी लागली आहे. त्यामुळे पालिकेच्या आगामी निवडणुकीत विकासाची दिशा असणारे नेतृत्व समोर येण्याची वाट येथील मतदार पहात आहे.

साडेसतरानळी, केशवनगर, महादेवनगर, आकाशवाणी हा भाग तसा पूर्वीपासूनच राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. मात्र, याच पक्षातून पुढे भारतीय जनता पार्टीत प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून येथे जिल्हा परिषद व मांजरी ग्रामपंचायतच्या निमित्ताने कमळ फुलले आहे. आता ही संपूर्ण गावे पालिका हद्दीत आली आहेत. जुना प्रभाग तोडून ११ गावांच्या प्रभागातील दोन गावे व नव्याने पालिकेत आलेल्या मांजरी ग्रामपंचायतचा काही भाग मिळून नवीन प्रभाग निर्माण झाला आहे. या प्रभाग रचनेत साडेसतरानळी, आकाशवाणी या राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्याला केशवनगर व मांजरी ग्रामपंचायतचा काही भाग जोडला गेल्याने भाजपाच वढत्या ताकदिला छेद बसला आहे.

हा प्रभाग साडेसतरानळी, केशवनगर, महादेव नगर व आकाशवाणी अशा चार प्रमुख भागात विभागला आहे. त्यामुळे प्रत्येक पक्षाला उमेदवारीचा समन्वय साधताना मोठी कसरत करावी लागणार आहे. आघाडी झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेससाठी हा प्रश्न जटील होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडे इच्छुकांची संख्या मोठी आहे. आघाडी झाल्यास ही संख्या वाढणार आहे. भाजपकडे सध्या या प्रभागातून चार-पाच उमेदवारांनी दावा केला आहे. यामध्ये अजून भर पडण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीला हा बालेकिल्ला अभेद्य ठेवायचा आहे तर, भाजपला त्याला सुरुंग लावायच आहे. मात्र, दोन्ही पक्षाच्या स्थानिक नेतृत्वाकडून व लोकप्रतिनिधींकडून झालेल्या व केल्या जाणाऱ्या कामाचा लेखाजोखा तपासून मतदार हा कौल कोणाच्या पारड्यात टाकेल हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. आमदार चेतन तुपे व माजी आमदार योगेश टिळेकर यांच्या संपर्काचा येथे प्रभाव राहणार आहे.

हा प्रभाग नवीन असल्याने विद्यमान कोणीही नेतृत्व येथे उमेदवार राहील असे वाटत नाही. मात्र जिल्हा परिषद, पंचायत समिती, बाजार समिती व ग्रामपंचायतमध्ये नेतृत्व केलेल्या उमेदवारांची येथे लढण्याची प्रबळ इच्छा दिसत आहे.

पुरेसे पाणी, रस्तेविकास, ड्रेनेज व कचरा व्यवस्थापन, गुंठेवारी, कालवा सुधारणा, उद्यान, क्रीडांगण, दवाखाना आदी प्रश्न येथील नागरिकांच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. त्याच्या पूर्ततेसाठी खात्री देणाऱ्या विश्वसनीय उमेदवाराच्या प्रतीक्षेतच ते असलेले दिसतात.

• अंदाजे मतदार संख्या : ५९ हजार

• जनगणनेनुसार लोकसंख्या : ५५६५९

• अंदाजे लोकसंख्या : १ लाख पेक्षा अधिक

नवी हद्द कशी असेल :

मुंढवा चौकापासून मगरपट्टा रस्त्याने कीर्तनेबाग, अमनोरा मॉल, पीएनजी मागून साडेसतरानळी, सिरम इन्स्टिट्यूट, आकाशवाणी, पंधरा नंबर, लक्ष्मीकॉलनी, मत्स्यबीज केंद्र, महादेवनगर, साडेसतरानळी कडून पुढे केशवनगर रस्त्याकडील डाव्या बाजूने फ्लोरिडा इस्टेट असा हा प्रभाग विस्तारलेला आहे.

• प्रमुख समस्या : पाणी, ड्रेनेज, रस्ते, कचरा, कचरा व्यवस्थापन, भाजीमंडई, उद्यान, गुंठेवारी इत्यादी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Navale Bridge Accident : पुण्यातील नवले पुल परिसरात अपघाताची मालिका सुरूच; तीव्र उतारावरून येणाऱ्या ४ ते ५ गाड्यांची धडक

Mokhada Accident:'पालघर- संभाजीनगर बसला अपघात'; 25 हुन अधिक प्रवासी जखमी, तिघे गंभीर..

Latest Marathi Breaking News: घाटकोपरच्या केव्हीके शाळेत पुन्हा विषबाधेचा प्रकार

Winter Care Tips : थंडीत तुमचा कूलर बनेल Room Heater! फक्त 130 रुपयांत 'हा' करा सोपा जुगाड

Viral Video: 'झटपट पटापट, रांगोळी काढा पटापट...' डॅनी पंडितच्या गाण्याने लोकांना लावलं वेड, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT