corona dead body e sakal
पुणे

पुणे: कोरोनाच्या भीतीपोटी वृद्धेची आत्महत्या?

पांडुरंग सरोदे -सकाळ वृत्तसेवा

पुणे : नाना पेठेतील एका रुग्णालयामध्ये दाखल केलेल्या वृद्ध महिलेवर कोरोनासंबंधी उपचार सुरु असताना वृद्ध महिला रुग्णालयातून निघून गेली. त्यानंतर महिलेचा हडपसर येथून जाणाऱ्या मुठा कालव्यामध्ये रविवारी सकाळी मृतदेह आढळून आला. महिलेने कोरोनाच्या भितीपोटी आत्महत्या केली असण्याची शक्‍यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

याप्रकरणी 60 वर्षीय महिलेचा अकस्मात मृत्यु झाल्याची नोंद हडपसर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. समर्थ पोलिस ठाण्यात महिला बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समर्थ पोलिस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर कपडे व कुटुंबातील सदस्यांनी सांगितलेल्या वर्णनावरुन महिलेची ओळख पटली. संबंधीत महिला कोरोनाबाधीत झाल्यानंतर तिला गणेश पेठेतील एका रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्या रुग्णालयामध्ये तीन रुग्णांचा मृत्यु झाला. या घटनेमुळे महिला नैराश्‍येत गेली. तिने कुटुंबीयांशी संपर्क साधून तिला दुसऱ्या रुग्णालयात हविण्यास सांगितले होते. त्यानुसार, महिलेची मानसिक स्थिती लक्षात घेऊन कुटुंबीयांनी तिला 6 मे रोजी दुसऱ्या रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले होते.दरम्यान, शनिवारी पहाटेच्या सुमारास महिला कोणालाही काही न सांगता तेथून निघून गेली होती.

पुण्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Milk Uninon Kolhapur News : ‘गोकुळ’ उभारण्यासाठी आनंदराव पाटील चुयेकरांनी घरातील सोनेही गहाण ठेवलं; शशिकांत चुयेकर भावुक

Samruddhi Sugar Factory: ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा! समृद्धी कारखाना देणार प्रतिटन ३०० रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर अनुदान

Viral Story : ९५ हजार पगाराची नोकरी गेली, घरच्यांचं वागणंच बदललं; म्हणाले- तुला जन्म देऊन चूक झाली, २२ वर्षीय तरुणाने पोस्टद्वारे मांडली व्यथा

Dairy Farmers: दूध उत्पादकांचे अर्थकारण कोलमडले; पशुखाद्याच्या दरात चार महिन्यांत २५ ते ३५ टक्के वाढ, दुधाच्या दराचा ताळमेळ बसेना

Maharashtra Live News : ज्ञानेश कुमार यांच्याविरोधातील निवडणूक मोदी शाहांनी आपल्यावर घेतली : आशुतोष रांका

SCROLL FOR NEXT