pune sakal
पुणे

प्रयेजा सिटीजवळील दफनभूमीची दुरवस्था

महापालिकेकडून सुविधांचा अभाव; वीरशैव लिंगायत समाजाकडून नाराजी

सकाळ वृत्तसेवा

सिंहगड रस्ता : प्रयेजा सिटी परिसरात असलेल्या वीरशैव लिंगायत समाज दफनभूमीची दुरवस्था झाली आहे; तेथे त्वरित डागडुजी करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. सिंहगड रस्ता परिसरातील महामार्गालगत रघुनंदन हॉलजवळील भागात वीरशैव लिंगायत समाजाची दफनभूमी आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात राडारोडा पडला असून, दफनभूमीची दुरवस्था झाली आहे. येथील मुख्य प्रवेशद्वार तुटलेले आहे. तसेच आतील भागात राडारोडा पडला आहे. (Pune News)

सीमाभिंतींनाही तडे गेले आहेत. यासोबतच परिसरात खड्डे पडले आहेत. गवत वाढले आहे. कचरा साचला आहे. तसेच विजेची सोयदेखील या ठिकाणी नाही. याशिवाय मद्यपी येथे मद्यपान करतात. दफनभूमी ओढ्याच्या बाजूस असल्याने प्राणी तसेच इतर कोणीही आत येतात. मध्यंतरी येथे चोरांनी चोरून आणलेल्या दानपेटी फोडून त्यातील मुद्देमाल फोडलेल्या पेट्या तुटलेल्या अवस्थेत आढल्या होत्या. महापालिकेची दफनभूमी असूनदेखील येथे सुरक्षारक्षक नाही.

परिणामी दफनभूमीची सुरक्षा ऐरणीवर आली आहे. या ठिकाणी सर्व सोयीसुविधा उपलब्ध नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. परिणामी नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. या ठिकाणी दुरुस्ती करून सुरक्षारक्षक नेमावा आणि परिसर स्वच्छ करावा, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष शरद दबडे यांनी सिंहगड क्षेत्रीय कार्यालयाच्या सहायक आयुक्त जयश्री काटकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

वीरशैव लिंगायत समाज दफनभूमीची दुरावस्था झाली आहे. त्या ठिकाणी अंत्यविधीसाठी कोणत्याही सोयीसुविधा नाहीत. येथील सुरक्षा ऐरणीवर आली असून, महापालिकेने सुरक्षारक्षक नेमावा.

- धनंजय पाटील, अध्यक्ष, वीरशैव धारेश्वर सेवा संघ

येथे मद्यपींचा वावर वाढला आहे. तसेच अनेकदा चोरांनी फोडून आणलेल्या दानपेट्यादेखील येथे फोडलेल्या अवस्थेत आढळून आल्या आहेत. राडारोडा टाकताना प्रवेशद्वारच तोडून टाकल्याने परिसराची अवस्था अधिकच बिकट झाली आहे. त्यामुळे त्वरित कार्यवाही करण्याची आवश्यकता आहे.

- महादेव दुर्गे, नागरिक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Kisan Samman Nidhi : प्रतिक्षा संपली ! देशातील १० कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 'या' दिवशी जमा होणार २००० रुपये

Palghar : भाजपने पालघर साधू हत्याकांडाचे आरोप ज्यांच्यावर केले त्याच नेत्याला घेतलं पक्षात, प्रवेशाचा मोठा कार्यक्रम

‘मला काय होतंय ते पाहायचं होतं’ हार्ट अटॅकनंतर पूर्ण शुद्धीत सुष्मिता सेनने सर्जरी केली

Amravati:'पोटातल्या बाळासह गर्भवतीचा आणि इतर २ बालकांचा मृत्यू'; उपजिल्हा रुग्णालयातली धक्कादायक घटना..

Latest Marathi Breaking News : परंडा नगराध्यक्षपदासाठी शिवसेनेचा अर्ज दाखल; तानाजी सावंत उपस्थित

SCROLL FOR NEXT