msedcl substations Sakal Media
पुणे

बारामती : महावितरणास तौते चक्रीवादळाचा फटका

बारामती परिमंडलात महावितरणचे 48 उपकेंद्र बाधीत.

मिलिंद संगई, बारामती

बारामती :  महावितरणला  ‘तौक्ते चक्रीवादळा’चा तडाखा बसला आहे. चक्रीवादळाने बारामती परिमंडलात महावितरणचे 48 उपकेंद्र बाधीत झाले असून, घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिकसह 3 लाख 42 हजार 385 ग्राहकांचा वीजपुरवठा विस्कळीत झाला होता.  वीज कर्मचाऱ्यांनी काही तासांतच 44 उपकेंद्र व 3 लाख ग्राहकांचा वीजपुरवठा सुरळीत केला आहे. तर कोवीड रुग्णालये, कोवीड केअर सेंटर्स, ऑक्सीजन निर्मिती केंद्रे यांच्या अखंडित वीजपुरवठ्यासाठी सर्व वीज यंत्रणा 24 तास कार्यरत आहे.

ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत, महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी चक्रीवादळाशी संबंधित परिमंडलांना या नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी पूर्व कल्पना देऊन विभागीय पातळीपर्यंत नियंत्रण कक्ष स्थापन करुन सर्व कक्ष मुख्यालयाच्या नियंत्रण कक्षाशी कायम संपर्कात राहून आवश्यक उपाययोजना केल्या जात आहेत.

पुणे, सोलापूर व सातारा जिल्ह्यात चक्रीवादळ येण्यापूर्वीच वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने वीज यंत्रणेला मोठा तडाखा दिला. बारामती परिमंडलात रविवारी दुपारपर्यंत मिळालेल्या महितीनुसार 547 विजेचे खांब कोसळले. तर 18773 रोहित्र बंद पडल्याने 869 गावांतील वीजपुरवठा विस्कळित झाला होता. मात्र वीज कर्मचाऱ्यांनी अविरत परिश्रम घेऊन 15319 रोहित्रांचा वीजपुरवठा पर्यायी मार्गाने पूर्ववत करुन बाधित पैकी 797 गावे सुरु झाली. तर उर्वरित गावामधीलही बहुतांश वीजपुरवठा पर्यायी मार्गाने सुरु करण्यात येत आहे.

वीजपुरवठा पूर्ववत करताना कोवीड हॉस्पीटल, कोवीड केअर सेंटर्स, ऑक्सीजन प्लान्ट, इतर सर्व रुग्णालये, लशीकरण केंद्रे, मोबाईल मनोरे, पाणी पुरवठा, रेल्वेसह सर्व अत्यावश्यक सेवा यांचा वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महावितरण प्रयत्नशील असून, संचालक (संचलन) संजय ताकसांडे व प्रभारी प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांच्या निर्देशानुसार मुख्य अभियंता सुनील पावडे यांनी सर्व विभागांना वादळानंतर पर्यायी मार्गाने तातडीने वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी साहित्य व मनुष्यबळ सदैव तयार ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार सर्व वीजपुरवठा कमीत वेळेत सुरळीत करण्यासाठी महावितरण यंत्रणा काम करत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain Update : पुण्यात पुन्हा पावसाचा जोर वाढला! औंधमध्ये जोरदार सरी, शहरातील अनेक भागांत पाऊस; पुणेकरांनी तारांबळ

Pune Solapur Highway: कदमवाकवस्तीत सेवा रस्त्यालगत कचरा; अपघातांचे सत्र अन् साथीच्या आजारांचा धोका, नागरिक संतप्त

Latest Marathi News Update : नागपुरातील ८ सराफा व्यापाऱ्यांना लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने जीवे मारण्याची धमकी; प्रत्येकी १० लाखांच्या खंडणीची मागणी, अभिनेता टायगर श्रॉफच्या उदाहरणाचा धाक

Bachchu Kadu : दिवाळी मदतीवरून बच्चू कडूंचा महायुती सरकारला घरचा आहेर, शेतकर्‍यांना 10 हजारांची मदत देण्याची मागणी

INDA vs NZA, Test: कठीण प्रसंगी जुरेल चमकला! ठोकले दमदार शतक, आकाश दीपचीही फिफ्टी; पण न्यूझीलंडच्या बॉयलकडून चोख प्रत्युत्तर

SCROLL FOR NEXT