पुणे

जेईई ॲडव्हान्सची तारीख लवकरच होणार जाहिर

- मीनाक्षी गुरव

पुणे : तुम्ही ‘जेईई ॲडव्हान्स्ड परीक्षा-२०२१’ची तयारी करत आहात का!! तर तुम्ही या परीक्षेचे संकेतस्थळ नक्की पहायला हवे. परीक्षेच्या आयोजक संस्थेने म्हणजेच ‘आयआयटी, खडगपूर’ने परीक्षेसंदर्भातील सविस्तर माहिती पुस्तिका नुकतीच संकेतस्थळावर अपलोड केली आहे. तसेच परीक्षेच्या सुधारित तारखा लवकरच जाहीर होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

यंदा जेईई ॲडव्हान्स्ड परीक्षेचे आयोजन करणाऱ्या खडगपूर येथील भारतीय तंत्रज्ञान संस्थेने (आयआयटी, खडगपूर) परीक्षेसाठी माहिती पुस्तिका नुकतीच प्रसिद्ध केली आहे. यामध्ये परीक्षेसाठी आवश्यक कागदपत्रे, आयआयटीमध्ये उपलब्ध असणारे अभ्यासक्रम, आरक्षित जागा यांचा सविस्तर तपशील दिला आहे. याशिवाय सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे जेईई ॲडव्हान्स्ड परीक्षेची तारीख लवकरच घोषित करण्यात येईल, असेही स्पष्ट केले आहे. जेईई ॲडव्हान्स्ड परीक्षेच्या प्रतीक्षेत असणारे विद्यार्थी ‘https://jeeadv.ac.in’ या संकेतस्थळावर जाऊन परीक्षेची माहिती पुस्तिका पाहू शकणार आहेत. त्याचप्रमाणे माहिती पुस्तिकेत दिलेल्या सूचनेनुसार, विद्यार्थ्यांना आपल्या कागदपत्रांची तयारी करणे शक्य होणार आहे. याबाबत आयआयटी खडगपुर या संस्थेने संकेतस्थळावर अधिकृत परिपत्रक जाहिर केले आहे. देशातील कोरोनाच्या महामारीमुळे ‘जेईई ॲडव्हान्स्ड परीक्षा २०२१’ लांबणीवर पडली आहे. मात्र, कोरोनाच्या संसर्गाची परिस्थिती पाहून योग्य वेळी परीक्षेची सुधारीत तारीख घोषित केली जाईल, असे आयोजक संस्थेने नमूद केले आहे. याबरोबरच नोंदणी, प्रवेश, समुपदेशनयासह सुधारित तारखा लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे.

जेईई ॲडव्हान्स्ड २०२०साठी यशस्वीपणे नोंदणी केलेल्या, मात्र या परीक्षेतील पेपर एक आणि पेपर दोन साठी अनुपस्थित राहिलेले सर्व विद्यार्थी देखील जेईई ॲडव्हान्स्ड २०२१ परीक्षेला उपस्थित राहण्यास पात्र राहणार आहेत. मात्र, या विद्यार्थ्यांनी ऑनलाइन रजिस्ट्रेशन पोर्टलवर पुन्हा नव्याने शुल्क भरून नोंदणी करणे आवश्यक आहे. एखादा विद्यार्थी सलग दोन वर्षांमध्ये जास्तीत जास्त दोन वेळा या परीक्षेसाठी पात्र ठरू शकणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Airport Fire: मुंबई विमानतळावर मोठी घटना, प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या बसला अचानक लागली आग, अग्निशमन दल घटनास्थळी

Crime News : भगवा दुपट्टा घालून मांसाहार केल्याने तरुणाला मारहाण, पोलिसांनी दोघांना घेतलं ताब्यात... नेमका कुठं घडला प्रकार?

Ganeshotsav 2025 : 'शंकराचा बाळ आला’ – सूर, श्रद्धा आणि भावनांचा सुंदर संगम; गणेशोत्सवासाठी नवीन गाणं प्रेक्षकांच्या भेटीस

Mumbai-Pune Latest Rain Live Updates Maharashtra : एकनाथ शिंदे यांनी आज महापालिकेच्या आपत्कालीन कक्षास दिली भेट

Online Gaming Bill: ऑनलाईन गेमिंग बिल! केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी; नेमका कायदा काय? कशावर येणार बंधन?

SCROLL FOR NEXT