Crime News esakal
पुणे

कुत्र्याचा राग मालकावर; कारची काच फोडून ४४ हजार लंपास

पाळीव श्‍वान अंगावर गेल्याने त्याच्या मालकाच्या कारची काच फोडून ४४ हजार रुपये चोरले

सकाळ डिजिटल टीम

पुणे: पाळीव श्‍वान अंगावर धावून गेल्याने झालेल्या वादाचा राग मनात ठेवून, श्‍वानाच्या मालकाच्या कारची काच फोडून त्यातील ४४ हजार रुपयांची रोख रक्कम आणि क्रेडिट कार्ड एकाने चोरले. शनिवारी रात्रीच्या नवी खडकी भागात हा प्रकार घडला.

या प्रकरणी पोलिसांनी प्रज्वल बाराथे (वय २०, रा. बाराथे वस्ती, सुभाषनगर, येरवडा) याला अटक केली आहे. तर एका अल्पवयीन मुला विरोधात येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विलास रघुनाथ बाराथे (वय ६७, रा. येरवडा) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. फिर्यादींच्या घरासमोरून जात असताना त्यांचे पाळीव कुत्रे आरोपीच्या अंगावर गेले. त्यावरून वाद झाला होता. फिर्यादीच्या जावयाने त्यांची कार नेताजी शाळेच्या गेटजवळ उभा केली होती.

दरम्यान, श्‍वान अंगावर आल्याने झालेल्या वादाचा राग मनात ठेवून आरोपींनी कारची पाठीमागील काच फोडून नुकसान केले तसेच कारमधील बॅगेत ठेवलेली ४४ हजार रुपयांची रोख रक्कम आणि क्रेडिट कार्ड असा मुद्देमाल चोरून नेल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. गुन्ह्याचा पुढील तपास करण्यासाठी आरोपीस सात दिवसांची पोलिस कोठडी द्यावी, अशी मागणी सहायक सरकारी वकील बोधिनी यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दिवाळीच्या उत्सवात मुंबईत अग्नितांडव! कुठे इमारतीला आग, तर कुठे दुकानं जळून खाक; मुंबई-ठाण्यात कुठे काय घडलं?

IPL 2027 Trade : दुनिया हिला देंगे ते वनक्कम! अक्षर पटेल CSK, तर अर्शदीप सिंग Mumbai Indians च्या ताफ्यात! मजेशीर Video Viral

या बाथरूममध्ये अंघोळीला कधी येऊ? सिद्धार्थ मितालीच्या नव्या घराला पाहून लोकप्रिय अभिनेत्याची भन्नाट कमेंट; रिप्लाय देत म्हणाला-

Maharashtra Live News : इराणसोबतची चर्चा निष्फळ - अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ

Kolhapur News: बांधकाम व्यावसायिकाला १८ कोटींचा गंडा ;गुप्तचर अधिकारी असल्याचे भासवले ;अभिजित आंदळकरसह सहा जणांवर गुन्हा

SCROLL FOR NEXT