Sakal
पुणे

‘म्युकरमायकॉसीस’संबंधीच्या औषधांबाबत यंत्रणा गाफील

कोरोनाच्या उपचारासाठी लागणाऱ्या ‘रेमडेसिव्हिर’ औषधाचा काळाबाजार झाल्यावर मोठी आरडाओरड झाली. तेंव्हा एफडीएने हे औषध नियंत्रणात घेतले.

सम्राट कदम

पुणे - ‘म्युकरमायकॉसीस’ (Mucormycosis) मुळे शहरात बुरशीविरोधी औषधे (Medicine) आणि इंजेक्शनचा (Injection) तुटवडा भासत आहे. मात्र, त्याचा बाजारपेठेत काळाबाजार (Black Market) होत नसून, शासनाकडूनही (Government) अद्याप कोणतेही आदेश आलेले नाही. त्यामुळे आम्ही ही औषधे नियंत्रणात घेऊ शकत नाही, असे अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) (FDA) वतीने सांगण्यात आले आहे. (The FDA system is unaware of the drugs for Mucormycosis)

कोरोनाच्या उपचारासाठी लागणाऱ्या ‘रेमडेसिव्हिर’ औषधाचा काळाबाजार झाल्यावर मोठी आरडाओरड झाली. तेंव्हा एफडीएने हे औषध नियंत्रणात घेतले. आता पुन्हा या बुरशीविरोधी औषधांबद्दल असेच झाल्यावरच ‘एफडीए’ कारवाई करेल, असे अप्रत्यक्ष सुचवत एफडीएने या प्रकरणात हात वर केल्याचे दिसत आहे. म्युकरमायकॉसीसच्या उपचारासाठी शहरात पुणे जिल्ह्यासह नगर, सातारा, कोल्हापुर, औरंगाबाद, नाशिक आदी भागांतून रूग्ण येत आहे. रुग्णांची वाढती संख्या आणि त्यासाठी आवश्यक औषधांची कमतरता पाहता वैद्यकीय क्षेत्रात चिंता व्यक्त केली जात आहे. मात्र, प्रशासन अजूनही याबाबत बघ्याची भूमिका घेत असल्याचे दिसत आहे.

दुर्मिळातील दुर्मिळ रोग असलेल्या म्युकरमायकॉसीसच्या औषधांची निर्मिती मागणी नसल्यामुळे कमी होत होती. आता मात्र, शेकडो पटींनी त्याच्या मागणीत वाढ झाली आहे. तसेच, हा आजार दीर्घकाळ राहणार असल्यामुळे यासंबंधीचे औषध आणि इंजेक्शनचा पुरवठा सुरळीत करण्यासाठी एफडीएने यावर नियंत्रण मिळविणे आवश्यक आहे. एफडीएचे सहायक आयुक्त एस.व्ही. प्रतापवार म्हणाले,‘‘काल परवापर्यंत या आजाराबद्दल फार काही लोकांना माहीत नव्हते. निश्चितच म्युकरमायकॉसीसच्या रूग्णसंख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे औषधांच्या मागणीतही वाढ झाल्याचे दिसत आहे. परंतु, कंपन्यांनी औषधांचे उत्पादन वाढविल्या पुरवठा सुरळीत होईल.’’

म्युकरमायकॉसीच्या उपचारासाठीचे औषधे :

- बुरशीविरोधी गोळ्या

- पोस्केनॉझॉल इंजेक्शन

- ॲम्पोटेरेसीन-बी इंजेक्शन

कोरोनानंतर आता विविध आजारांमध्ये वाढ होत आहे. रुग्णांमध्ये विविध प्रकारचे कॉंप्लीकेशन वाढत आहे. त्यामुळे सगळीच औषधे नियंत्रणात आणता येणार नाही. वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाने पोस्ट कोवीड उपचारासंबंधी काही प्रोटोकॉल निश्चित केला. तर

त्यासंबंधी काही हालचाली करता येतील.

- एस.व्ही. प्रतापवार, सहायक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, पुणे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC: PAK vs SL सामन्यात थरार! ४,६, ६, ६... श्रीलंकेच्या कर्णधारानं दिलेलं पाकिस्तानला टेन्शन, पण शेवटच्या चेंडूवर यजमान पराभूत

PAK vs SL: श्रीलंकेने १४८ धावा करताच पाकिस्तानचा 'गेम ओव्हर'! T20 WC सेमीफायनल भारतातच होणार...

छत्रपती शिवाजी महाराजांचे पहिले शिल्प महाराष्ट्रात नाही, तर तमिळनाडूच्या 'या' किल्ल्यावर; मराठ्यांचा ज्वलंत इतिहास, एकदा नक्की बघा

T20 WC, PAK vs SL: साहिबजादा फरहानचे शतकासह विश्वविक्रम, पाकिस्तान २०० पार; पण श्रीलंकेत फिक्सिंगची चर्चा; जाणून घ्या कारण

Ganja Seized : बारामतीत अडीच कोटींचा 470 किलो गांजा हस्तगत...

SCROLL FOR NEXT