पुणे

वारीचा अंतिम निर्णय मुख्यमंत्रीच घेतील : अजित पवार

मिलिंद संगई,

बारामती : ''वारीच्या संदर्भात वारकऱ्यांच्या भावना तीव्र आहेत. काल याबाबत बैठक झाली मात्र वारकरी संप्रदाय व सरकार या दोघांनाही मान्य होईल''अशा प्रकारचा मार्ग अजून निघालेला नाही. पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली आहे, या समितीशी वारकरी चर्चा करुन मुख्यमंत्री या बाबत अंतिम निर्णय घेतील, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. बारामतीत आज आढावा बैठकीनंतर माध्यमांशी बोलतांना त्यांनी ही माहिती दिली.

''साखरेचा जो कोटा ठरवून दिला आहे, तितकी साखर उचलली गेली नाही'', व्यापारी टेंडर भरत नाही, मागणी व पुरवठा या वर साखरेचा दर अवलंबून असतो, ब्राझीलमध्ये पाण्याची परिस्थिती गंभीर बनलेली असल्यामुळे त्याचा प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष फायदा देशाला व राज्याला होत आहे. साखर निर्यातीचे दरही बरे आहेत मात्र बरेच साखर कारखाने व्याजाच्या भुर्दंड सहन करुन मेटाकुटीस येत आहेत. एका पोत्याला दररोज एक रुपया व्याज भरावे लागते. पोते वर्षभर गोदामात राहिले तर पोत्याला 365 रुपये व्याज भरावे लागते., व्याजातच कारखाने अडचणीत येतात त्या मुळे शेतक-यांना योग्य भाव देता येत नाही, त्या मुळे पेट्रोलमध्ये इथेनॉल 20 टक्के मिसळण्याचा निर्णय चांगला आहे, असे अजित पवार म्हणाले. असे असले तरी तयार होणारे इथेनॉल ताबडतोब उचलले जात नाही, काही कारखानदार परराज्यात इथेनॉल देत आहेत त्या मुळेही खर्च वाढतो आहे. ज्यूस टू इथेनॉल तयार करायलाही केंद्राने परवानगी दिली आहे. उसापासून ज्यूस करुन साखर न करता थेट इथेनॉलही तयार करण्यास आता परवानगी मिळाली आहे. हीही बाब चांगली आहे.

''इलेक्ट्रीक टू, थ्री व फोर व्हिलर व बसेसना आम्ही प्रोत्साहन देत आहोत. यात करात काय सवलत देता येईल किंवा अजून काय करता येईल या साठी आम्ही विचार करतो आहोत. वीजेवर चालणारी वाहने आल्यानंतर इंधनाची मागणी कमी होऊन वीजेची मागणी वाढेल व त्यानंतरच इंधन दरवाढीतून काही दिलासा मिळू शकेल, असेही पवार यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात नमूद केले.

शिवराज्यभिषेकाचा कार्यक्रम सर्वांनी नियमांचे पालन करुन साजरा करावा असे आवाहन त्यांनी केले. लहान मुलांनीही शाळेत गेल्यावर झाडे लावून झाडे जगविण्याचा उपक्रम करावा, त्याला काही गुण देता येतील का या बाबत मी स्वताः सूचना आजच्या मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात केली आहे अशी माहिती पवार यांनी दिली. बियाणे व खतांच्या बाबती तुटवडा भासणार नाही, असा राज्याच्या कृषी विभागाचा अंदाज असल्याचे त्यांनी नमूद केले. खतांचा साठा बऱयापैकी असून युरीयाचाही साठा आहे, असे ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026: ५ पैकी ५... RCB कडे आहे असा खेळाडू जो देतो चॅम्पियन बनण्याची गॅरंटी! आजपर्यंत कधी हरला नाही T20 फायनल

NIA Deputy SP Accident: भरधाव दुचाकीची कंटेनरला धडक; राष्ट्रीय तपास संस्थेच्या उपअधीक्षकांचा दुर्दैवी मृत्यू; प्रेयसी गंभीर जखमी

Latest Marathi News Live Update : पंजाब सरकारी कर्मचाऱ्यांचा मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या निवासस्थानी मोर्चा

अभिषेक बॅनर्जी हल्ला प्रकरणाला वेगळं वळण, TMC आमदाराचे निकटवर्तीयच हल्लेखोर

Mumbai News: मुंबईतील २५० अनधिकृत बांधकामांवर हातोडा, महापालिकेची धडक मोहीम

SCROLL FOR NEXT