Ruppes-bank Sakal
पुणे

रुपीच्या ठेवीदारांसाठी अर्थमंत्र्यांना साकडे

बँकेच्या समस्येचे लवकर निराकरण करून ठेवीदारांना दिलासा मिळणे आवश्यक आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे: रुपी सहकारी बॅंकेच्या समस्येचे निराकरण करून ठेवीदारांना दिलासा द्यावा, अशी मागणी खासदार गिरीश बापट आणि रुपी बॅंकेचे प्रशासक सुधीर पंडित यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे केली. खासदार बापट आणि ‘सहकार भारती’चे राष्ट्रीय प्रचारप्रमुख भालचंद्र कुलकर्णी यांच्यासमवेत रुपी बँकेचे प्रशासक पंडित यांनी ११ ऑगस्ट रोजी अर्थमंत्री सीतारामन यांची दिल्लीत भेट घेतली.

शतकोत्तर इतिहास असणारी रुपी बँक गेली आठ वर्षे रिझर्व्ह बँकेच्या सर्वंकष निर्बंधाखाली आहे. त्यामुळे बँकेच्या समस्येचे लवकर निराकरण करून ठेवीदारांना दिलासा मिळणे आवश्यक आहे. व्यवहार्य दृष्टिकोन ठेवून प्रागतिक व वैविध्यपूर्ण उपाययोजना केल्यास हा प्रलंबित प्रश्न सुटू शकेल. तसेच, नागरी सहकारी बँक क्षेत्रावरही त्याचा चांगला परिणाम होईल. त्यामुळे अर्थमंत्र्यांनी त्यांच्या अधिकारात बँकेच्या प्रश्‍नावर दीर्घकालीन उपाययोजना त्वरित होण्यासाठी लक्ष घालावे, अशी मागणी या वेळी करण्यात आली.

"रुपी बँकेच्या प्रश्‍नावर रिझर्व्ह बँकेने वेळीच दीर्घकालीन तोडगा काढला असता तर सर्व ठेवीदारांना त्यांच्या ठेवी परत मिळाल्या असत्या. गेली आठ वर्षे प्रश्न रखडल्यामुळे ठेवीदार तणावाखाली आहेत. अनेकांना आर्थिक विवंचनेतून जावे लागत आहे. उदार व व्यवहार्य दृष्टिकोन ठेवून रिझर्व्ह बँकेने योग्य उपाययोजना करून विमा संरक्षित नसलेल्या ठेवीदारांचेही हित जपावे". सीए सुधीर पंडित, प्रशासक- रुपी सहकारी बॅंक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: दिल्लीच्या आंदोलनात पुन्हा हिंसा! तरुणांकडून दगडफेक; पोलिसांकडून लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या

Devala News : विवाहितेने दोन लहान मुलींसह गावाबाहेरच्या विहिरीत उडी टाकून संपविले जीवन

Sonam Wangchuk: रुग्णालयातून सोनम वांगचुक यांचा पहिला व्हिडिओ, सरकारला दिला 'असा' प्रस्ताव, भावनिक प्रतिक्रिया समोर

Pune Mechanical Parking Demolition: संभाजी उद्यानातील अडीच कोटींचे मेकॅनिकल पार्किंग जमीनदोस्त; महापालिकेचा लोखंडी सांगडा हटविण्याचा प्रस्ताव स्थायी समितीपुढे

Mahagaon Bribe Case : अंगणवाडी मदतनीस नियुक्तीसाठी लाचेची मागणी; महिला व बाल विकास प्रकल्प अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT