Bibtya e sakal
पुणे

पुणे : वनविभाग माणसांवर हल्ला होण्याची वाट पाहात आहे का?

निरगुडसर शिंगवे या गावात दररोज बिबट्याचे होणारे दर्शनामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

नवनाथ भेके निरगुडसर

पुणे : निरगुडसर शिंगवे (ता.आंबेगाव) येथील साकोरेमळ्यात मंगळवार (ता.१७) रोजी सांयकाळी पाच वाजण्याच्या सुमारास टोमॅटोच्या शेतात बिबटया ठाण मांडून बसल्याचा व्हिडिओ येथील स्वप्निल वाव्हळ यांनी आपल्या कॅमेऱ्यात कैद केला. अशाप्रकारे दररोज बिबटयाचे होणारे दर्शनामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. पशु हल्ल्यात शेतकऱ्यांचे नुकसान होत असुन, अदयाप वनविभागाला जाग येत नाही.

माणसावर हल्ला होण्याची वाट वनविभाग पाहात आहे का? असा संतप्त सवाल येथील शेतकरी करत आहे. शिंगवे येथील साकोरेमळ्यातील शेतकरी स्वप्निल गोरक्ष वाव्हळ यांना मंगळवारी सकाळी अकरा व सांयकाळी पाच वाजता बिबटयाचे दर्शन झाले. त्यांच्या टोमॅटोच्या शेतात तोडणीसाठी गेले असता बिबट्या ठाण मांडून बसला होता. त्यांनी आपल्या चारचाकी गाडीत बसुन व्हिडिओ काढला तरी सकाळनंतर संध्याकाळीही बिबटया शेतातच ठाण मांडून बसला होता.

शेतातील टोमॅटो न तोडता शेतकऱ्यांना तेथुन परतावे लागले. शिंगवे व वळती परिसरात बिबट्याच्या हल्ल्याचे सत्र सुरू असून, परिसरात हल्ल्याच्या चार ते पाच घटना घडल्या आहे. त्यामध्ये शेळ्या, मेंढ्या, पाळीव कुत्रे, वासरे मृत्युमुखी पडली तर काही जखमी अवस्थेत सापडली आहेत. वनविभागाचे अधिकारी येतात पंचनामा करून जातात मात्र एवढ्या घटना घडून देखील बिबट्याला जरेबंद करण्यासाठी पिंजरा का लावत नाही. वनविभाग आता माणसांवर हल्ला होण्याची वाट बघतंय का? असा संतप्त सवाल शिंगवेचे सरपंच संतोष नामदेव वाव्हळ व ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.

शिंगवे (ता आंबेगाव) गाढवे मळा येथे नथु बबन गाढवे यांच्या चार शेळ्यांवरती बिबट्याने हल्ला केलाय, तसेच वळती (शिंगवे) येथील अर्जुन मारुती गाढवे यांच्या तीन वर्षाची शेळी, एक बोकड, पाळीव कुत्रा बिबट्याने केलेल्या हल्ल्यात असे सात पाळीव प्राणी मृत्यूमुखी पडले आहेत. अशा अनेक घटना परिसरात घडल्या असून, स्थानिक ग्रामस्थांनी तात्काळ वन विभागाशी संपर्क साधून पंचनामा करून घेतला खरा मात्र; वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांच्या पिंजरा लावण्याचा मागणीकडे दुर्लक्ष केल्याने, पुन्हा त्याच परिसरात बिबट्या फिरताना दिसत आहे. सरपंच सिता पवार, उपसरपंच संतोष नामदेव वाव्हळ व ग्रामस्थांनी वारंवार मागणी करूनही वनविभागाने बिबट्याला जरेबंद करण्यासाठी कुठल्याही उपाय योजना केल्या नसल्याने ग्रामस्थांमध्ये बिबट्याच्या दहशतीमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amazon child shopping: आता बोला...! आई-वडील झोपेतच अन् तिकडं त्यांच्या लाडक्या चिमुकल्यानं चक्क 'अमेझॉन'वर केली अडीच लाखांची खरेदी

Mahadev Munde Case: खळबळजनक! '‘महादेव मुंडे खून प्रकरणातील प्रत्यक्षदर्शीला वाल्मीकने संपवलं’', आकस्मिक मृत्यूचा बनाव

MLA Ramesh Thorat : माजी आमदार रमेश थोरात घड्याळ हाती बांधण्याच्या तयारीत; अशोक पवार मात्र पक्षातच समाधानी

Latest Marathi News Updates: देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

MLA Rahul Kul : उजनी धरणाच्या बॅक वॉटरमध्ये बुडीत बंधारे उभारावेत; आमदार कुल यांची अधिवेशनात मागणी

SCROLL FOR NEXT