Temperature esakal
पुणे

Temperature : पुण्यात वाढला उन्हाचा चटका

पुणे - शहरात महाशिवरात्रीनंतर उन्हाच्या तडाख्यात वाढ झाली आहे. कमाल तापमानाने रविवारी (ता. १०) ३६.९ अंश सेल्सिअसपर्यंत उसळी मारली.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - शहरात महाशिवरात्रीनंतर उन्हाच्या तडाख्यात वाढ झाली आहे. कमाल तापमानाने रविवारी (ता. १०) ३६.९ अंश सेल्सिअसपर्यंत उसळी मारली. किमान तापमान सरासरी इतके म्हणजे १४.८ अंश सेल्सिअस नोंदवले. पुढील तीन दिवसांत कमाल तापमानात अंशतः वाढ होण्याची शक्यता हवामान खात्यातर्फे वर्तविण्यात आली आहे.

शहरात गेल्या दोन दिवसांपासून उन्हाचा चटका वाढला आहे. गेल्या सोमवारी (ता. ४) कमाल तापमानाचा पारा ३३.६ अंश सेल्सिअसपर्यंत कमी झाला होता. तो आठवड्याभरात प्रत्येक दिवशी वाढत गेला. आठवड्याभरात किमान तापमान ३.३ अंश सेल्सिअसने वाढले.

पंखे झाले सुरु

पुण्यात दुपारी उन्हाचा कडाका वाढल्याने दिवसभर पंखे सुरू झाले आहेत. संध्याकाळी वारे वाहत असले तरीही रात्री पुन्हा उकाडा वाढत असल्याने पंख्याशिवाय झोपणे अशक्य होत आहे. रविवार सुटीचा दिवस आणि उन्हाचा चटका जाणवत असल्याने शहराच्या मध्यवर्ती भागातील पेठांसह प्रमुख रस्त्यांवर दुपारी शुकशुकाट होता. आठवड्याच्या इतर दिवसांमध्ये गर्दीने ओसंडून वाहणाऱ्या लक्ष्मी रस्ता, टिळक, फर्ग्युसन, जंगली महाराज रस्त्यावर दुपारी एक ते तीन या दरम्यान तुरळक गर्दी होती.

पुण्यात कोरेगाव पार्क सर्वांत उष्ण

शहरात कोरेगाव पार्क भागात सर्वाधिक म्हणजे ३८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. पुणे, चिंचवड, लोहगाव, चिंचवड, मगरपट्टा, एनडीए येथे कमाल तापमान ३७ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. शहरातील सर्वांत कमी कमाल तापमानाची नोंद पाषाण येथे ३६ अंश सेल्सिअस झाली.

राज्यात उकाडा वाढला

राज्यातील बहुतांश शहरांमधील कमाल तापमानाचा पारा सरासरीपेक्षा २ ते ३ अंश सेल्सिअसने वाढला आहे. त्यामुळे उकाड्यात वाढ झाल्याचे निरीक्षण हवामान खात्याने नोंदविले आहे. राज्यात सोलापुरात सर्वाधिक म्हणजे ३९.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. बहुतांश ठिकाणी कमाल तापमानाच्या पाऱ्याने ३७ अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडल्याचेही हवामान खात्याने सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Himachal Pradesh Loyal Dog Video : ...अन् ‘हे’ मन हेलावणारं भावनिक दृश्य पाहून, बचाव पथकाच्या डोळ्यातही आलं पाणी!

Latest Marathi News Live Update : शत्रू मालमत्तेच्या खरेदी-विक्रीवरील मुद्रांक शुल्क माफ

Rahgiri Anand Utsav : उज्जैनमध्ये राहगिरी आनंद उत्सव; शेतकऱ्यांना समर्पित सोहळ्यात मुख्यमंत्र्यांचा सहभाग

Eknath Shinde : जिल्हा परिषद निवडणुकांसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा झंझावात, साताऱ्यातून प्रचाराचा शुभारंभ

SL vs ENG, ODI: जो रूटचा रेकॉर्डब्रेक फॉर्म! शतक ठोकत विराट-सचिन पंक्तीत स्थान; हॅरी ब्रुकच्या वादळासमोरही श्रीलंकन गोलंदाज हतबल

SCROLL FOR NEXT