The Kerala Story show in FTII 
पुणे

The Kerala Story show in FTII : विद्यार्थ्यांनी चित्रपट पाहिल्यानंतरच विरोध करायला हवा, राहुल सोलापूरकर कडाडले

सम्राट कदम

पुणे : भारतीय चित्रपट आणि दूरचित्राणी संस्थेत (एफटीआयआय) शनिवारी सकाळी 'द केरला स्टोरी'चे स्क्रीनिंग आयोजित करण्यात आले होते. यावेळी संस्थेतील विद्यार्थी आणि माजी विद्यार्थी संघटनेने विरोध दर्शवत चित्रपटाला विरोध केला. सकाळी ९ वाजता चित्रपट सुरू होताना दोन्ही गटांकडून घोषणाबाजी करण्यात आली.

मागील काही दिवसांपासून एफटीआयआयमध्ये विद्यार्थ्यांचे शैक्षणिक कारणास्तव आंदोलन चालू होते. शनिवारी सकाळीच केरला स्टोरी मुळे आंदोलनाची दिशा बदलली. एफटीआयआयमधील २०२० च्या तुकडीतील पाच विद्यार्थ्यांना प्रशासनाने शैक्षणिक वर्षातील अनुपस्थिती आणि अपेक्षित गुणांकन नसणे या कारणास्तव काढून टाकले होते.

या विरोधात एफटीआयआय स्टुडंट्स असोसिएशनने गेल्या पाच दिवसांपासून उपोषण सुरू केले आहे. उपोषणाचा पाचवा आणि आंदोलनाचा चाळीसावा दिवस चालू होता. केरला स्टोरीच्या स्क्रीनिंगलाही संघटनांनी विरोध केला असून पोलीस बंदोबस्तात स्क्रीनिंग पार पडले. शहरातील चित्रपट, नाट्य आणि अभिनय क्षेत्रातील अनेकांनी चित्रपटाला उपस्थिती दर्शवली होती.

जसा मला चित्रपट पाहण्याचा अधिकार आहे. तसाच विद्यार्थ्यांनाही द केरला स्टोरी चा विरोध करण्याचा अधिकार आहे. त्यांनी चित्रपट पाहावा मंग बोलावे.

- योगेश सोमण, अभिनेते

आज-काल विरोधाची ही परंपरा निर्माण झाली आहे.विद्यार्थ्यांनी चित्रपट पाहिल्यानंतरच विरोध करायला हवा.

- राहुल सोलापरकर, अभिनेते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 World Cup 2026 : पाकिस्तानी वंशांच्या क्रिकेटपटूला T20 World Cup साठी भारताने व्हिसा नाकारला; सोशल मीडियावर लिहितो की...

Sangli Election : विमानतळापासून शेरीनाल्यापर्यंत विकासाची चर्चा, महापालिका निवडणुकीत स्थानिक मुद्द्यांचा बोलबाला

Yeola Municipal Election : येवला पालिकेत रणकंदन! उपनगराध्यक्ष पदाच्या अर्जावरून मोठा राडा; विरोधकांचा पहिल्याच सभेवर बहिष्कार

Belly Fat Reduction: पोटाची चरबी कमी करायची आहे? हार्वर्ड डॉक्टरांकडून जाणून घ्या डाएटचं बेस्ट फॉर्मुला

Latest Marathi News Live Update : नालासोपाऱ्यातील पकडलेल्या पैसा प्रकरणात मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT