पुणे

कुटुंब तर सोडा, माझं लहान लेकरूही एकदाच जेवतेय !

शरयू काकडे

पुणे : वसाहतीमधील एका छोट्याशा घरात श्यामा, त्यांचे पती, सासू-सासरे व एक मुलगा असा परिवार राहतो. पती वाहनचालक, तर श्यामा जवळच्याच सोसायट्यांमध्ये धुण्याभांड्याची कामे करतात. चार ठिकाणी काम केल्यानंतर त्यांना महिन्याकाठी चार हजार रुपये मिळतात. त्या पैशावर कुटुंबाचे रेशन, दूध, गॅस असा खर्चाचा भार हलका होतो. पतीच्या पगाराचे पैसे औषधोपचार, मुलाचे शिक्षण व अन्य गोष्टींवर खर्च होतात. हातावर पोट असतानाही आत्तापर्यंतच्या आयुष्यात या छोट्याशा कुटुंबावर कधी उपासमारीची वेळ आली नाही. पण २०२० च्या मार्चपासून आलेल्या कोरोनाने श्यामा यांचे जगणे अवघड केले.

मार्च २०२० मध्ये अनेक घरकामगारांचे काम गेले. श्‍यामावरही हेच संकट कोसळलं. तीन-चार वर्षे ज्यांच्याकडे काम केले, त्यांनीच काम थांबविण्यास सांगितले. हे चित्र बदलेल, सगळे काही सुरळीत होईल, म्हणून श्यामा आणि त्यांचे कुटुंब भविष्याकडे डोळे लावून बसले. जून २०२० मध्ये लॉकडाउन शिथिल झाला, मात्र श्यामा यांना पुन्हा काम मिळाले नाही. संकटाने इथेच पाठ सोडली नाही, तर त्यांच्या पतीचे वाहन चालविण्याचे कामही बंद झाले. संसार चालवायचा कसा, छोटा मुलगा, वृद्ध सासू-सासरे यांच्या पोटापाण्याचे आता काय, असा प्रश्‍न त्यांच्यासमोर उभा राहिला. वृद्ध सासूला धुण्याभांड्याची कामे मिळाली आणि कुटुंबाच्या पोटाला दोन घासाचा आधार मिळाला. मात्र, श्यामा आणि त्यांच्या पतीला एक वर्ष उलटले, तरी हाताला काम नाही.

कोरोनाने घेतलेल्या अग्निपरीक्षेविषयी श्यामा सांगतात, ‘‘कोरोना, लॉकडाउनने हातावर पोट असणाऱ्या आमच्यासारख्या गरिबांचे खूप हाल केले. काबाडकष्टाची सवय आहे आम्हाला. कष्ट करून जगू शकतो. पण हाताला काम पाहिजे ना? हाडामासाच्या गरिबांनाही पोट आहे, रेशनवर चार किलो तांदूळ, चार किलो गहू मिळतो. आठ-दहा दिवसांत हे धान्य संपते. उसने घेऊन पुढचे दिवस एक वेळच्या जेवणावर काढावे लागतात.’’

‘‘सरकारने आमच्या हाताला काम द्यावे, किमान महिन्याला पुरेल इतके धान्य द्यावे. या संकटातून बाहेर पडण्यासाठी आमची धडपड तरी सुरू राहील. परिस्थिती अशीच कायम राहीली तर नाही सांगता येणार पुढे काय होईल ते...’’ श्यामा यांचा उदास चेहरा भविष्यातील घडणाऱ्या एखाद्या संकटाची तर चाहूल नाही, ना असा प्रश्‍न व्यवस्थेसमोर उभा करून जातो.

''अगोदर दोन-तीन टाइम जेवायचो. मुलाला खाऊ घालायचो. आता मात्र तीन वेळांऐवजी एकाच वेळी जेवण करून पोटाची भूक भागवतोय. एवढेच काय, माझ्या छोट्या मुलावरही एक वेळ जेवायची किंवा अर्धपोटी जेवायची वेळ आली आहे. हाताला काम मिळाले तरी आम्ही किमान पोटाला दोन घास खाऊ शकतो. पोटाला चिमटा घ्यावा लागतो, हे बोलणं सोपं आहे. पण असा किती दिवस पोटाला चिमटा घेणार साहेब?''

- श्यामा दुबे, घरकामगार

''रिक्षाचालक, बांधकाम मजुरांना तत्काळ अनुदान मिळाले; परंतु मोलकरणींना अजून अनुदान मिळाले नाही. २०१५ मध्ये मोलकरणींची नोंदणी झाली होती. पाच वर्षांनंतर त्याची कागदपत्रे आता त्यांना सापडणार नाहीत. त्यामुळे तांत्रिक गोष्टींमध्ये अडकून पडण्यापेक्षा सरकारने मोलकरणींना तत्काळ अनुदान देण्यासाठी प्राधान्य द्यावे.''

-मेधा थत्ते, सचिव, पुणे शहर मोलकरीण संघटना

  • ० हजार (२०१५ च्या नोंदणीनुसार)

  • शहर व जिल्ह्यातील मोलकरणींची संख्या

  • २५० ते ३००

  • सध्याची नोंदणीकृत मोलकरणींची संख्या

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : मराठी माणसासाठी शेवटची निवडणूक, मुंबईसाठी एक व्हा; राज ठाकरेंचं आवाहन

IND vs NZ, 1st ODI: विराट कोहलीचं शतक हुकलं, पण भारतानं मैदान जिंकलं! रोमांचक सामन्यात न्यूझीलंडचा पराभव

Bigg Boss Marathi 6 Live Update: लीलाच्या एजेची राकेश बापटची 'बिग बॉस मराठी ६' मध्ये एंट्री

सोशल मीडिया स्टार करण सोनवणेची बिग बॉस मराठी 6 मध्ये धमाकेदार एंट्री, सोनवणे वहिनी घरात राडा घालणार?

Bigg Boss Marathi 6 : बॅकग्राऊंड डान्सर म्हणून स्ट्रगल, मालिकांमधून प्रसिद्धी आता बिग बॉसमध्ये राडा करायला आला आयुष संजीव !

SCROLL FOR NEXT