Corona-Patient
Corona-Patient 
पुणे

दिलासादायक! पुण्यात नव्या रुग्णांपेक्षा कोरोनामुक्तांची संख्या जास्त

शरयू काकडे

पुणे : पुण्यात कोरोनाच्या नवीन रुग्णांची संख्या कमी झाली असून गेल्या काही दिवसांपासून कोरोनामुक्तांची संख्या वाढली आहे. मंगळवारी दिवसभरात पुणे शहरात 246 नवीन रुग्ण सापडले तर 251 जण बरे होऊन घरी परतले. तर पिंपरी-चिंचवडमध्ये 199 नव्या रुग्णांची नोंद झाली असून 224 जण कोरोनामुक्त झाले. (The number patients Recovered from Corona is higher in Pune than in new patients)

पुणे जिल्ह्यात मंगळवारी 1335 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले. गेल्या 24 तासात कोरोनामुक्तांची संख्या नव्या रुग्णांपेक्षा जास्त आढळली आहे. एकूण कोरोनमुक्तांचा आकडा 10,05,327वर पोहचला आहे. मात्र दुसऱ्या बाजुला नव्या रुग्ण संख्येनं पुन्हा एक हजाराचा टप्पा ओलांडला आहे. दरम्यान जिल्ह्यात गेल्या 24 तासात 1142 नवे कोरोना रुग्ण आढळले असून एकूण बाधितांचा आकडा 10,34,059 इतका झाला आहे.

पुणे शहर आहे पिंपरी-चिंचवडमध्ये अनुक्रमे 2 हजार 773 आणि 1520 सक्रीय रुग्ण आहेत. मंगळवारी 4748 जणांची कोरोना चाचणी झाली असून शहरात आतापर्यंत 25.86 लाख जणांची कोरोना चाचणी झाली आहे. दरम्यान जिल्ह्यात सध्या 11255 कोरोना रुग्ण सक्रिय आहेत त्यापैकी 7610 रुग्णांवार हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत तर 3645 रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत. मंगळवारी दिवसभरात 23 जणांचा मृत्यू झाला असून जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनामुळे 17 हजार 477 जणांनी प्राण गमावले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sonia Gandhi : ''माझं लेकरु तुम्हाला सोपवत आहे... तो तुम्हाला निराश करणार नाही'', सोनिया गांधी भावुक

MI vs LSG Live Score IPL 2024 : लक्ष रोहित अन् हार्दिकवरच! मुंबई अन् लखनौ शेवट गोड करण्यासाठी भिडणार

Lok Sabha Election 2024 : ‘ते’ राममंदिरावर बुलडोझर घालतील; पंतप्रधान मोदींची ‘सप’, ‘काँग्रेस’वर टीका

Video: अंधाराचा फायदा घेऊन त्यानं तरुणीला गाठलं अन्...; अंगावर काटा आणणारा व्हिडिओ

Latest Marathi News Live Update : शरद पवार, अरविंद केजरीवाल भिवंडीतील सभेत दाखल

SCROLL FOR NEXT