Daund Railway  esakal
पुणे

Daund Railway : दौंड - रेल्वे प्रवाशांचे हाल आणि प्रशासनाची अरेरावी

प्रवाशांना तीन किलोमीटर पायपीट करीत दौंड रेल्वे स्थानक गाठावे लागले.

प्रफुल्ल भंडारी

दौंड : पुणे - दौंड दरम्यान धावणारी दुपारी तीन वाजताची मेनलाइन इलेक्ट्रिक मल्टिपल यूनिट (मेमू) सिग्नल मधील बिघाडाच्या कारणावरून तब्बल सव्वातास लोहमार्गावर थांबवून ठेवण्यात आली होती. त्यामुळे प्रवाशांना तीन किलोमीटर पायपीट करीत दौंड रेल्वे स्थानक गाठावे लागले.

पुणे रेल्वे स्थानकावरून सुटलेली मेमू गाडी आपल्या नियोजित वेळेपेक्षा १२ मिनिटांच्या विलंबाने धावत होती. दौंड रेल्वे स्थानकाच्या आधी दौंड कॅार्ड लाइन स्थानकाच्या मागे दुपारी पावणेपाच वाजता गाडी थांबविण्यात आली. त्या दरम्यान एक लांब पल्ल्याची गाडी पुढे निघाली. गाडीतील प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाकडे विचारणा केली परंतु बिघाड दुरूस्त केव्हा होणार ?, याचे उत्तर त्यांच्याकडे नव्हते. अखेर त्रस्त प्रवाशी एक तासानंतर मुख्य लोहमार्गावरून जीव धोक्यात घालून पायी निघाले. बहुतांश प्रवाशांची दुचाकी वाहने दौंड रेल्वे स्थानकातील वाहनतळावर असल्याने त्यांना तेथपर्यंत पायपीट करावी लागली. मेमू १ तास १६ मिनिटांच्या विलंबानंतर दौंड रेल्वे स्थानकात दाखल झाली.

त्यानंतर दौंड रेल्वे स्थानकावरून पुण्याकडे जाणारी सायंकाळी पाच वाजताची गाडी सोडण्यात आली नाही. परंतु त्या कालावधीत मात्र तीन लांब पल्ल्याच्या गाड्या पुण्याच्या दिशेने सोडण्यात आल्या. संतप्त प्रवाशांनी या बाबत स्थानक व्यवस्थापक कार्यालयात जाऊन विचारणा केली असता त्यांना अरेरावी करण्यात आली. तक्रार पुस्तकाची मागणी केल्यानंतर त्यास नकार देण्यात आला, परंतु प्रवाशांची वाढती गर्दी पाहून तक्रार पुस्तक दिल्यानंतर प्रवाशांनी तक्रारी नोंदविल्या.दौंड रेल्वे स्थानकाचे व्यवस्थापक जे. त्रिपाठी यांना या बाबत विचारले असता त्यांनी सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने विलंब झाल्याचे सांगत अधिक भाष्य केले नाही.

रेल्वे सुरक्षा दलाची अरेरावी

प्रवाशांची झालेली गैरसोय दूर करून त्यांना पर्यायी गाड्यांमधून व्यवस्था करून देण्याची जबाबदारी रेल्वे प्रशासनाची आहे. मात्र दौंड स्थानक व्यवस्थापक कार्यालयात जमा झालेल्या प्रवाशांना रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी काही विशेष कारण नसताना फक्त गर्दी केल्यावरून अरेरावी करीत दमदाटी केली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TB मुक्तीसाठी 'सरपंचां'ना साकडं! गावागावांत 'हँड हेल्ड एक्स-रे'द्वारे स्क्रीनिंग; लक्षणे नसलेल्या रुग्णांना शोधून मोफत उपचार

आजचे राशिभविष्य - 16 ऑगस्ट 2026

Aries Weekly Horoscope: मेष राशीसाठी मोठी खुशखबर! जुने वाद मिटणार, नवी दारे उघडणार; 'या' दिवसांत मिळेल भाग्याची साथ

साप्ताहिक राशिभविष्य : (१६ ऑगस्ट २०२६ ते २२ ऑगस्ट २०२६)

Taurus Weekly Horoscope: वृषभ राशीच्या नशिबाला मिळणार मोठी कलाटणी! नोकरी, पैसा आणि प्रवासात मिळणार अनपेक्षित लाभ

SCROLL FOR NEXT