पुणे

फुलांच्या गावात दरवळतोय ''जिरॅनियम''चा सुगंध

हितेंद्र गद्रे

यवत: मागील काही वर्षांपासून फूल उत्पादक शेतकऱ्यांनी यवतला ''फुलांचे गाव'' म्हणून नावारूपास आणले. मात्र, अलीकडील काळात वातावरणातील बदल, पावसाची अनियमितता, रोगांचा प्रादुर्भाव, वाढलेला उत्पादन खर्च अशा वेगवेगळ्या कारणांनी शेती अडचणीत आली. त्यावर पर्याय म्हणून यवत (ता. दौड) येथील सचिन शितोळे व इतर शेतकऱ्यांनी जिरेनियमची लागवड करण्यास सुरुवात केली आहे.यामुळे जिरॅनियमचा सुगंध दरवळत आहे.

जिरॅनियम ही वेगवेगळ्या हवामानात वाढणारी बहुवार्षिक वनस्पती आहे. झुडूप वर्गीय ही सुगंधी वनस्पती आहे. पाण्याचा निचरा होणाऱ्या हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या जमिनीत या वनस्पतीची लागवड केली जाते. यापासून सुगंधी तेलाचे उत्पादन घेतले जाते.

या शेतीविषयी सांगताना सचिन शितोळे म्हणाले, की लागवड केल्यावर हे पीक तीन वर्षे शेतात राहते. त्यासाठी योग्य मशागत गरजेची असते. मशागतीनंतर व्यवस्थीत बेड तयार करावे लागतात. त्यावर ठिबक सिंचन व्यवस्था करावी. त्यानंतर दोन रोपांमध्ये दीड फुटांचे तर दोन ओळींमध्ये चार फुटाचे अंतर ठेवून लागवड करावी. एक एकरामध्ये दहा हजार रोपांची लागवड होते. सामान्यपणे २० ते ३४ अंश सेल्सिअस तापनात हे पीक चांगले येते.

तेल काढण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा सुरू केली तर आर्थिक लाभाचे प्रमाण वाढू शकते त्यासाठी किमान शंभर एकर जमिनीवर जिरेनियमची लागवड होणे गरजेचे आहे. त्यासाठी शेतकऱ्यांमध्ये जागृती करण्याचे काम सध्या सुरू आहे. सध्या तरी सचिन शितोळे, त्यांचे मोठे बंधू विनायक शितोळे व तात्याबा दोरगे या तीन शेतकऱ्यांनी या शेतीस सुरुवात केली आहे. इतरही दहा ते बारा शेतकरी जिरेनियमची लागवड करण्याच्या प्रयत्नात आहेत, असे शितोळे यांनी सांगितले.

देशात ३०० टन जिरॅनियम तेलाची मागणी देशात दर वर्षी २०० ते ३०० टन जिरॅनियम तेलाची मागणी आहे. सध्या हे उत्पादन केवळ १० ते २० टन इतकेच आहे. एका एकरात वर्षाला तीस ते चाळीस किलो जिरॅनियम तेल उत्पादन होऊ शकते. त्याची किंमत सुमारे १५ हजार ५०० रुपये प्रतिलिटर इतकी आहे. त्यामुळे देशात लाखो एकर जमिनीवर जिरॅनियमची लागवड झाली तरी त्याची मागणी कमी होणार नाही, असा विश्वास सचिन शितोळे यांना आहे.

लागवडीनंतर चार महिन्यांनी जिरॅनियमचे कापणीला येते. त्यानंतर प्रत्येक तीन महिन्यांनी कापणी करावी लागते. सुरुवातीला एकरी ७० ते ८० हजार रुपये खर्च येतो. इतर पिकांच्या तुलनेत या पिकासाठी उत्पादन खर्च तब्बल ७५ टक्के कमी असल्याने आर्थिक गणित चांगले जुळते. एका वर्षात एकरी चार ते पाच लाख रुपयांचे उत्पादन सहज घेता येते. या पिकाला देशात चांगली मागणी असल्याने या शेतीचे भविष्य उज्वल आहे.

- सचिन शितोळे, जिरॅनियम उत्पादक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नोरासारखी दिसायला पाहिजे, पत्नीला दररोज ३ तास...; पतीकडून छळ, महिलेची पोलिसात तक्रार

Maharashtra Latest News Update: महत्वाच्या विषयांवर फडणवीसांची भेट घेतली- राज ठाकरे

Reels addiction Impact on Brain: रील्सचा मोह करतोय मेंदूवर दारूसारखा परिणाम? जाणून घ्या धोके आणि तज्ज्ञांनी सांगितलेले उपाय

माेठी बातमी! 'इंडिया आघाडीचे खासदार आक्रमक; दूध दर वाढीसाठी संसद भवनासमोर आंदोलन', भेसळ करणाऱ्यांवर कारवाई करा

Pune Rain Update : ताम्हिणी घाटात ५७५ मिमी पावसाची नोंद; पुण्यात रेड अलर्ट

SCROLL FOR NEXT