The students are going back home from pune corona Team Esakal
पुणे

विद्यार्थ्यांनी धरला घरचा रस्ता

पुण्यात मेस बंद, सुमारे ३० टक्केच विद्यार्थी करताहेत मॅगी, बिस्कीटवरच गुजरान

सकाळ डिजिटल टीम

पुणे : ''राज्यात लॉकडाउन जाहीर झालेला असताना पुण्यातील मेस बंद असल्याने स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या बहुतांश विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा त्यांच्या गावाकडील घरचा रस्ता पकडला आहे. सध्या सुमारे ३० टक्केच विद्यार्थी पुण्यात राहात असून, ते देखील मॅगी, बिस्कीट यावरच गुजरान करत आहेत. पुण्यातील कोरोना संसर्ग वाढलेला असताना त्यामध्ये स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना देखील लागण झाली. त्यामुळे ११ एप्रिल रोजी होणारी परीक्षा पुढे ढकला'', अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली होती. त्यानुसार ही परीक्षा पुढे ढकलली आहे. या दरम्यान पुण्यामध्ये संसर्ग कमी करण्यासाठी निर्बंध लावण्यात आले आहेत. त्यामध्ये क्लास, अभ्यासिका बंद झाल्या आहेत. गेल्या आठवड्यापासून अनेक मेस देखील बंद झाल्याने विद्यार्थ्यांचे जेवणाचे हाल होत आहेत.

राज्यात १४ एप्रिल पासून लॉकडाउन जाहीर झाला आहे. त्यामुळे बहुतांश विद्यार्थी गावाकडे निघून गेले आहेत. पुण्यात सुमारे ३० टक्के विद्यार्थी आहेत, हे विद्यार्थी रुममध्ये बसून परीक्षेचा अभ्यास करत आहेत. तसेच गेल्या वर्षभरात तीन चार वेळा गावाकडे जावे लागले. परीक्षा आली की पुन्हा पुण्यात आले आहेत. त्यामुळे आता गावाकडे न जाण्याचा निर्णय या विद्यार्थ्यांनी घेतला आहे.

''माझ्या ओळखीतले अनेक जण गावाकडे गेले आहेत. पण मी पुण्यात राहूनच अभ्यास करत आहे. मेसला आठ दिवसांची सुट्टी दिली असून, सध्या रुमवर मॅगी, बिस्कीट यावरच भर आहे. तसेच काही वेळा बाहेरून पार्सल मागवत आहोत.''

- सारिका काळे, विद्यार्थीनी

''पुण्यात रुग्णसंख्या वाढत आहे, शिवाय निर्बंध आल्याने अभ्यासाची सोय नाही, खाण्यापिण्याचे हाल होत आहेत. परीक्षाही लवकर होईल असे वाटत नाही. त्यामुळे गावाकडे येण्याचा निर्णय घेतला आहे.''

- जितेंद्र जाधव, विद्यार्थी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rajya Sabha Candidates: राज्यसभा निवडणुकीत भाजपचा सस्पेन्स संपला; दोन राज्यांत उमेदवारांची घोषणा, कोण आहेत चेहरे? एक तर अभिनेत्री

PM Kisan: शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! पीएम किसानचा २४वा हप्ता कधी येणार? नवी अपडेट समोर

Prithviraj Chavan : ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा देऊन चालणार नाही, तर त्यांना...; पृथ्वीराज चव्हाणांचे घणाघाती आरोप, फौजदारी कारवाईचीही मागणी

मुलांचा आत्मविश्वास वाढवायचा असेल तर लहानपणापासूनच करा ‘या’ गोष्टी; करीना कपूरने सांगितला पालकांसाठी खास सल्ला

Latest Marathi News Live Update : पृथ्वीराज चव्हाण यांची मुख्य निवडणूक आयुक्तांवर गंभीर टीका; बडतर्फीची मागणी

SCROLL FOR NEXT