Theater
Theater 
पुणे

पुण्यातील थिएटर बंदच राहणार

सकाळवृत्तसेवा

पुणे - राज्य सरकारने चित्रपटगृहे सुरू करण्यास परवानगी दिली असली, तरी नवे चित्रपट नसल्याने दाखवायचे काय, असा प्रश्‍न थिएटरचालकांसमोर आहे. याशिवाय एक पडदा चित्रपटगृहचालकांनी तर थिएटर सुरू न करण्याचा निर्णय घेतला आहे. या काळात चित्रपटगृहे सुरू केली, तर अधिक खर्च होईल, अशी चिंता त्यांनी व्यक्त केली आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोरोनाची भीती लोकांच्या मनात असल्याने थिएटर सुरू केले, तरी प्रेक्षक येतील का ही देखील शंका चित्रपटगृह चालकांना सतावते आहे. त्यात ५० टक्के प्रेक्षकांनाच परवानगी दिल्याने आर्थिक गणित जुळणार नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे पूना एक्‍सझिबिटर्स असोसिएशन- पुणे चित्रपट मालक संघ यांनी चित्रपटगृह सुरू न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पुण्यातील एकपडदा चित्रपटगृह यापुढील काळात बंद राहतील. मल्टिप्लेक्‍स चालकांना नवीन चित्रपट प्रदर्शित होण्याची प्रतीक्षा आहे.

सदानंद मोहोळ म्हणाले, ‘‘आता चित्रपटगृह सुरू केल्यास नेहमीच्या खर्चापेक्षा दुप्पट खर्च होईल. तेवढे आर्थिक उत्पन्न मात्र मिळणार नाही. कारण कोरोनामुळे किती लोक सिनेमा पाहण्यासाठी येतील, हा प्रश्‍न आहे. या काळात कुटुंबीय एकत्रित सिनेमाला येऊ शकणार नाही. त्यामुळे प्रेक्षक कमी असतील, तर आर्थिक गणित कोलमडून जाईल. म्हणून कोरानाची लस येईपर्यंत एकपडदा चित्रपटगृहे आम्ही सुरू करणार नाही.’

नाट्यगृहे मोफत द्यावी
नाट्यगृहे सुरू करण्याच्या निर्णयाबद्दल नाट्यक्षेत्रात आनंद असला, तरी ५० टक्के प्रेक्षकांसह परवानगी हा अडचणीचा विषय आहे. त्यामुळे नाट्यगृहे सुरू झाली, तरी तेथे नाटक होतील का, याबाबतही अनिश्‍चितता आहे. याबाबत अभिनेते प्रशांत दामले म्हणाले, ‘‘निम्मी प्रेक्षक संख्या असेल, तर ते परवडण्यासारखे नाही. त्यामुळे सरकारने नाट्यगृहे जूनपर्यंत मोफत उपलब्ध करून द्यावीत. नाटकांच्या गाड्यांसाठी टोलमाफी द्यावी. मग विचार करता येईल. आधी नाट्यगृहे स्वच्छ करावी लागतील, त्याशिवाय नाटकांचे प्रयोग करता येणार नाहीत.’’

मल्टिप्लेक्‍सलाही अडचण
‘सिटी प्राइड’चे अरविंद चाफळकर म्हणाले, ‘‘आता एकही नवा चित्रपट प्रदर्शित नाही. त्यामुळे सिनेमागृहात काय दाखवायचे? त्यात एक-दोन स्क्रीन सुरू करता येतील, प्रेक्षकही निम्मे असतील. त्यामुळे नवे चित्रपट प्रदर्शित होण्यावर सिनेमागृह सुरू करायचे की नाही, हे अवलंबून आहे. येत्या पंधरा दिवसांत त्याबाबत काय होते, हे पाहून निर्णय घेऊ.’’

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : दुपारी तीन वाजेपर्यंत देशात 50.71 टक्के मतदान; महाराष्ट्र अजूनही सगळ्यात मागे

Fact Check : कोरोना लसीसंदर्भातील बातम्यांमुळे लस प्रमाणपत्रात बदल करण्यात आले नाहीत; व्हायरल होत असलेला दावा चुकीचा

जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश! चकमकीत लष्करचा प्रमुख बासित अहमद डारसह तीन दहशतवादी ठार

Kushal Badrike : "... ओळखीचे चेहरे अनोळख्या स्टेशनवर निघून जातात"; कुशलने व्यक्त केली खंत

Summer Home Decor Tips: उन्हाळ्याच्या सुट्ट्यांचा करुन घ्या फायदा; 'अशा' पद्धतीने करा घराचा मेकओव्हर.. सर्वजण पाहतच राहतील

SCROLL FOR NEXT