Theft in bus by Woman thief gang in Pune 
पुणे

Video : पुण्यात फिरतेय महिला चोरट्यांची टोळी; ओढणीचा फास टाकून मारतेय डल्ला

सकाळवृत्तसेवा

पुणे : पुणेकरांनो, तुम्ही दररोज बस,एसटीने प्रवास करत असाल तर सावधान! कारण पु्ण्यात ओढणीचा फास टाकून डल्ला मारणारी महिला चोरट्यांची टोळी फिरते   बसमध्ये चढत असताना तसेच प्रवासादरम्यान संधी साधून महिलांकडील दागिने व रोख रक्कम चोरी होण्याच्या घटना सातत्याने वाढत आहे. पुण्यातल्या स्वारगेट बस स्थानकात आठवड्याला तीन चार घटना घडत आहेत. स्वारगेट पोलिसांनी सीसीटीव्ही व चोरी करणाऱ्याचे फोटो जाहीर केलेत पुण्यात महिला चोर गँग सध्या सक्रिय झाली.


 

पुणे जिल्ह्यातील बसस्थानक जणू काही चोरट्यांचे आगार बनल्याची प्रचिती येत आहे. गेल्या वर्षभरात बसस्थानकातून सोने व रोख रक्कम चोरीच्या शेकडो घटना घडल्या आहेत. गावी जाताना महिला, पुरुष सोन्याचे दागिने व रोख रक्कम घेवूनच बाहेर निघतात. बसस्थानकात आलेल्यांना चोरट्यांची टोळी हेरते. बसमध्ये चढत असताना मुद्देमाल लांबविण्याचा प्रयत्न केला जातो.


ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पुण्यातील स्वारगेट बसस्थानकात महिला चोरांची गँगची दहशत पसरली आहे. एकट्या महिलेला सर्व महिला लुटतानाचा प्रकार सीसीटिव्हीत कैद झाला आहे. बसने प्रवास करत असल्याचे भासवून सोन्यावर डल्ला मारून लक्षात येण्याआधी या चोरटया महिला खाली उतरतात. चोरीची घटना लक्षात येईपर्यंत चोरट्यांनी पोबारा केलेला असतो. बहुतांश वेळा प्रवाशांची तपासणी करण्यात येते. मात्र, हाती काहीच लागत नाही बसस्थानक परिसरात वावरणाऱ्या चोरटे स्थानिकांच्या नजरेस पडतात. टोळीने फिरून सावज टिपतात. हे सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद आहेत. असे संशयित कुठं दिसल्यास जवळ पोलिसांना कळवा असे स्वारगेट पोलिसांचे आव्हान करतात.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोबाईल हॅक झाल्याची भीती, फार्मसीच्या २० वर्षीय तरुणानं जीवन संपवलं; एकुलत्या एक लेकाच्या मृत्यूनं आई-वडिलांचा आक्रोश मन हेलावणारा

CA Exam Result: 'सीए परीक्षेत सांगलीतील २० जणांचे उल्‍लेखनीय यश'; गेली काही वर्षे विद्यार्थ्यांचे यशात सातत्य

Eco Friendly Bill: ‘महावितरण’च्या ‘गो ग्रीन’ योजनेचा पाच लाख ग्राहकांनी घेतला फायदा

मी पाकिस्तानी लष्कराचा विश्वासू एजंट; 26/11च्या हल्याचा सूत्रधार तहव्वुर राणाचा मोठा खुलासा

Latest Maharashtra News Updates : पुण्यात २६ लाख रुपयांचे ड्रग्स जप्त; पोलिसांची मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT