पुणे

Pune Crime News : चोराने तोडलं मंदिराचं कुलूप पण सतर्क नागरिकांमुळे डाव फसला, सिंहगड रोडवरील घटना

निलेश बोरुडे

किरकटवाडी: सिंहगड रस्त्यावरील किरकटवाडी गावच्या हद्दीतील शिवनगर येथे भर दिवसा मंदिराचे कुलुप तोडून धातुची मुर्ती, पुजेची भांडी, समई व इतर साहित्य चोरुन नेण्याचा प्रयत्न सतर्क नागरिकांमुळे फसला आहे. मंदिरातून चोरलेल्या वस्तूंचं गाठोडं बांधून पळून घेऊन जाताना परप्रांतीय चोराला रंगेहाथ पकडून हवेली पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. सुरज लाला यादव (वय 23, सध्या रा. भाजी मंडई जवळ, खडकवासला , मुळ रा. छत्तीसगड) असे त्या चोरट्याचे नाव असून त्याच्यावर हवेली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

किरकटवाडी येथील अमृता विहार सोसायटीच्या आवारात श्री स्वामी समर्थ महाराज मंदिर आहे. या मंदिरात धातूची महागडी मुर्ती, पुजेची भांडी, पितळी समई व इतर साहित्य होते. दररोज सकाळी नियमित पूजाविधी झाल्यानंतर कुलुप लावले जाते. आज सायंकाळी चार वाजता सुरज यादव हा भामटा सोसायटीच्या आवारात आला व रहिवाशांची नजर चुकवून त्याने मंदिराचे कुलुप तोडले. मंदिरातील मुर्तीसह इतर साहित्याचं तेथीलच कापड घेऊन गाठोडं बांधलं आणि डोक्यावर घेऊन चालत निघाला.

सोसायटीच्या रहिवाशांना शंका आल्यानंतर त्याला विचारले असता अगोदर कचरा घेऊन चालल्याचे त्याने सांगितले. रहिवाशांनी त्याला थांबायला सांगितल्यानंतर तो पळू लागला त्यावेळी गौतम माने, किरण दसवडकर, संतोष रायकर,शोभाचंद जाधव, मनिषा बांदल, प्रवीण रोकडे, अशोक उबाळे, विलास मते, धनंजय मते व इतर तरुणांनी त्याचा पाठलाग सुरू केला. कोल्हेवाडी चौकातून खडकवासला गावाकडे पळताना त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. याबाबत हवेली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रभारी अधिकारी आयपीएस अनमोल मित्तल यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील कार्यवाही सुरू आहे.(swamisamartha mandir kirkatvadi)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: मुंबई सुरक्षेत चौथ्‍या स्‍थानावर! ‘राष्ट्रीय गुन्हे अन्वेषण’चा अहवाल; सर्वाधिक गुन्हेगारी कोणत्या शहरात?

मुसळधार पावसाचा हाहाकार! पूल कोसळून ६ जणांचा मृत्यू, भूस्खलनामुळे रस्ते बंद

Kolhapur News : देवीची मूर्ती मंडपात; साउंडची ईर्ष्या चौकात, पोलिसांनी काठ्यांनी मारलं तरीही बारा तासांहून अधिक काळ मंडळांनी अडवले रस्ते

Latest Marathi News Live Update: शेतकर्‍यांना आज मदतीची गरज- शरद पवार

Kolhapur Tragedy : क्लासमध्ये ओळख, मैत्रिणीला कोल्हापुरातून उचललं; पंढरपुरात ४ दिवस कोंडलं, कोकणात नेलं पण तिथून पळून गेली अन्...

SCROLL FOR NEXT