Theft stole Rs 1.5 lakh worth of jewelry kept for Lakshmi Puja in pune 
पुणे

'ते' टेरेसवर फिरायला गेले अन्‌ चोरट्यांनी घरात घुसून लक्ष्मीपुजेसाठी ठेवलेले दीड लाखाचे दागिने पळविले ! 

सकाळवृत्तसेवा

पुणे : लक्ष्मीपुजनाच्या दिवशी ताम्हणाच्या पात्रात त्यांनी दागिने ठेवून त्याची पूजा केली. गोडधोड जेवणानंतर घराचा दरवाजा ओढून रात्री शतपावली करण्यासाठी घराच्या टेरेसवर फिरायला गेले. तितकीच संधी साधत चोरट्याने घरात शिरून ताम्हणाच्या पात्रात ठेवलेले दीड लाख रुपये किमतीचे दागिने घेऊन पळ काढल्याचा प्रकार शनिवारी रात्री वारजे माळवाडी येथे घडला. 

पुण्यातील इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

दिवाळीच्या लक्ष्मीपुजनाची शनिवारी सगळ्यांच्याच घरात जय्यत तयारी सुरू होती. वारजे माळवाडी येथे राहणाऱ्या 37 वर्षीय नागरिकाच्या घरीदेखील लक्ष्मीपुजेची तयारी झाली होती. देवपूजेसाठी मांडलेल्या ताम्हणाच्या पात्रामध्ये दागिने, पैसे व अन्य मौल्यवान वस्तू ठेवून नागरिकाच्या कुटुंबीयांनी त्यांची धार्मिक पद्धतीने पूजाअर्चा केली. पूजा झाल्यानंतर कुटुंबीयांनी एकत्र जेवण घेतले. त्यानंतर रात्री साडे दहा वाजता शतपावली करण्यासाठी ते घराच्या टेरेसवर गेले. जाताना त्यांनी घराचा दरवाजाला कुलूप लावण्याऐवजी दरवाजा फक्त ओढून घेतला.

फिर्यादीच्या घराचा दरवाजा उघडा असल्याचे व आतमध्ये कोणीही नसल्याचे पाहून चोरट्याने त्यांच्या घरात शिरून ताम्हणाच्या पात्रामध्ये ठेवलेले दीड लाख रुपये किमतीचे दागिने चोरून नेले. फिर्यादी शतपावली करून परत आल्यानंतर त्यांना दागिने दिसले नाहीत. त्यांनी घरामध्ये शोध घेतला, मात्र दागिने सापडले नाहीत. त्यांचे दागिने चोरट्यांनी चोरून नेल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. 

हे वाचा - दिवाळीत घरफोड्या करणाऱ्या चोरट्यांना अटक; 29 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

लक्ष्मीपुजनाच्याच दिवशी घराच्या अर्धवट उघड्या खिडकीतून हात घालून मुख्य दरवाजाची कडी उघडून घरात लक्ष्मीपुजेसाठी ठेवलेले सात ते आठ लाख रुपये किमतीचे दागिने व रोकड चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली. त्याच दिवशी फिर्यादी यांच्याही घरी चोरीचा प्रकार घडला. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक संजय चव्हाण करीत आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games : स्क्वॅशमध्ये दोन सुवर्णपदकं हुकली! अनाहत-अभय यांना रौप्य, तर बॉक्सिंगमध्ये दोन मेडल्स पक्के

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी खुशखबर! ऑगस्ट महिन्याचा हप्ता खात्यात जमा होण्यास सुरूवात, १५०० की ३०००? असं करा चेक

Ohh No! भारतीय गोलंदाज जखमी, स्ट्रेचरवरून हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले; असं नेमके काय घडले?

मनीष मल्होत्रांच्या रॅम्पवर सेलिब्रिटींचा जलवा! सगळीकडे आलियाच्या साडीची चर्चा, लूक पाहून चाहते घायाळ

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या औषध निरीक्षक पेपरफुटीप्रकरणी मोठी अपडेट

SCROLL FOR NEXT