PMP-Bus 
पुणे

पीएमपीच्या तीन मार्गांवर उत्पन्नात दररोज किती लाखांची होते वाढ

सकाळ वृत्तसेवा

पुणे - वाहक व चालकांसाठी सुरू करण्यात आलेल्या प्रोत्साहन भत्त्यामुळे पुणे महानगर परिवहन महामंडळाचे (पीएमपी) तीन मार्गांवरील उत्पन्न वाढले आहे. १५ नोव्हेंबरपासून सुरू करण्यात आलेल्या या योजनेमुळे मार्गांवरील रोजचे उत्पन्न सुमारे सात लाख रुपयांनी वाढले आहे. 

कमी झालेली प्रवासी संख्या व उत्पन्न वाढविण्यासाठी पीएमपीकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून चालक-वाहकांना प्रोत्साहन भत्ता देऊन पीएमपीच्या काही मार्गांचे उत्पन्न वाढविण्याची युक्ती करण्यात आली आहे. यामध्ये प्रशासनाने पहिल्या टप्प्यात कात्रज ते पुणे स्टेशन, कात्रज ते शिवाजीनगर व स्वारगेट ते धायरी या तीन बसमार्गांवर सकाळ व दुपार सत्रामध्ये चालक व वाहकांसाठी प्रायोगिक तत्त्वावर प्रोत्साहन भत्ता योजना सुरू केली. १५ नोव्हेंबर पासून सुरू झालेल्या या योजनेमध्ये चालक व वाहकांनी निश्‍चित उद्दिष्टापेक्षा जास्त उत्पन्न आणल्यास वाढीव रकमेवर प्रत्येकी १० टक्के भत्ता दिला जात आहे. योजनेची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर उत्पन्नामध्ये वाढ झाल्याचा दावा पीएमपी प्रशासनाने केला आहे. १५ ते ३० ऑक्‍टोबर या कालावधीतील उत्पन्न आणि १५ ते ३० नोव्हेंबर या कालावधीतील उत्पन्नाची तुलना केली असता त्यातील प्रतिदिनी उत्पन्न ७ लाख रुपयांनी वाढले आहे. 

२० डिसेंबरपासून खंडोजीबाबा चौक ते एसएनडीटी कॉलेज, पाटील इस्टेट ते दापोडी, सिमला ऑफिस ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, येरवडा ते वाघोली, डेक्कन कॉलेज ते विश्रांतवाडी, महात्मा गांधी बसस्थानक ते हडपसर, भोसरी ते चाकण व आळंदी या मार्गांवर अंमलबजावणी सुरू होईल, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Prediction: सोन्याचा भाव 2030 पर्यंत 2 लाखांच्या पुढे जाणार! काय आहे तज्ञांचा नेमका अंदाज?

Maratha Reservation: मनोज जरांगेंचा मुंबईकडे प्रवास सुरू; दोन वाहने आणि दोन रुग्णवाहिका सोबत, पाटोद्यात पहिला मुक्काम

बुलडोझर कारवाईत मर्यादा ओलांडली; हायकोर्टानं अधिकाऱ्यांना फटकारलं, इमारत पुन्हा बांधा आणि १० लाख देण्याचे आदेश

Latest Marathi News Update : धाराशिव मधील मराठा कार्यकर्ते मुंबईवर जाण्यावर ठाम

Maharashtra SET Exam 2026 : सेट परीक्षेच्या तारख्येत पुन्हा बदल! आता 27 ऐवजी 'या' दिवशी होणार परीक्षा, विद्यापीठाची नवीन घोषणा

SCROLL FOR NEXT