plasma-therapy 
पुणे

शिक्रापूरमधील चार जणांचे रिपोर्ट आलेत असे... 

भरत पचंगे

शिक्रापूर (पुणे) : शिरूर तालुक्‍यातील शिक्रापूर येथे दोन दिवसांपूर्वी कोरोनाबाधित गर्भवती महिला सापडल्यामुळे हैराण झालेल्या येथील नागरिकांना आज दिलासा मिळाला. तिच्याशी संबंधित चौघांचे वैद्यकीय अहवाल आज निगेटिव्ह आले, अशी माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. वैजनाथ काशीद यांनी दिली. 

शिक्रापूर येथील मोठ्या गृहप्रकल्पात रहिवासी असलेली एका 31 वर्षीय महिलेला दोन दिवसांपूर्वी (ता. 2) कोरोना झाल्याचे निदर्शनास आले. परिसरातील कोरोनाबाधित होणारी ती चौथी रुग्ण होती. त्यामुळे शिक्रापूर परिसर भीतीच्या सावटाखाली होती. त्यातच एक रुग्ण कोरोनामुळे मृत्यू पावल्याने गावात गंभीर वातावरण आहे. या पार्श्‍वभूमीवर कोरोनाबाधित महिलेशी संबंधित तिची आई, पती, नर्स व रुग्णवाहिका चालक यांनाही क्वारंटाइन करून त्यांचे नमुने तातडीने मुंबईत पाठविले होते. त्याचा अहवाल आज निगेटिव्ह आला. 

दरम्यान, चौघांचे अहवाल कसेही आले; तरी आम्ही ही बाब गांभीर्याने घेतलेली असून, गावात सर्व पद्धतीच्या दक्षता घेत आहे. संबंधित महिला राहत असलेल्या रहिवासी सोसायटीत ग्रामपंचायतीकडून निर्जंतुकीकरणाचे काम सुरू असल्याची माहिती प्रभारी सरपंच भगवानराव वाबळे यांनी दिली. 

दारूसाठी मात्र रांगा 
सर्व दूर कोरोनाचे सावट आणि गावात पंधरा दिवसांपूर्वी कोरोनामुळे एकाचा मृत्यू झाला असतानाही आज दारू विक्रीला सरकारने दिलेल्या परवानगीने येथील वाइन शॉपवर तब्बल 500 ते 600 मीटरपर्यंत मद्यपींच्या रांगा लागल्या होत्या. 
 

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aryavir Sehwag Century: १७ चौकार अन् ७ षटकार... ज्युनियर सेहवागची दीडशतकी खेळी अन् शुभमन गिलच्या विक्रमाची केली बरोबरी

Viral Video : लेकीची दिवाळी साजरी करण्यासाठी आईने शेळी विकली...भावनिक व्हिडिओ व्हायरल

पुढच्या पाच दिवसांत ५ राशींचं नशीब चमकणार! वक्री शुक्र देणार भरभरून लाभ, उत्पन्नाचे नवे मार्गही खुलणार

Annasaheb Jolle Halsiddhnath Sugar Factory: निपाणीच्या हालसिद्धनाथ साखर कारखान्याची २०२६-२७ हंगामासाठी ३७७० रुपये पहिली उचल जाहीर

Sonia Gandhi Book : "अजिबात नाही!"; भारताचे पंतप्रधानपद का नाकारले? अनेक वर्षांनंतर गांधी घराण्यातील 'त्या' निर्णयामागचे सत्य उघड!

SCROLL FOR NEXT