पुणे - पुण्यात कोरोनामुक्त झालेल्यांचा आकडा पुन्हा वेगाने वाढू लागला असून, एका दिवसात पावणेतीनशे रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे आतापर्यंत सुमारे साडेपाच हजार रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. याच दिवसभरात ३०४ रुग्ण सापडले आहेत. अडीच हजारांहून अधिक रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मृतांची संख्या कमी होऊन बुधवारी (ता. १०) ती तीनपर्यंत खाली आहे.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
दरम्यान, विविध रुग्णालयांतील २१४ रुग्णांची प्रकृती गंभीर असून, त्यातील ४३ जण ‘व्हेंटिलेटर’वर आहेत. मृतांत ५० आणि ६० पेक्षा अधिक वयोगटातील रुग्णांचा समावेश आहे. कोरोनासोबत त्यांना अन्यही आजार असल्याचे निष्पन्न झाले आहे. जनवाडीतील ६२ वर्षांच्या महिलेचा मृत्यू झाला असून, त्यांना आठ जून रोजी हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. त्यांचा सकाळी मृत्यू झाला. त्यांना मधुमेह, उच्च रक्तदाब होता. येरवड्यातील ६९ वर्षांच्या महिलेचा बळी गेला आहे. त्या २२ मेपासून रुग्णालयात होत्या. या महिलेलाही अन्य आजार होते. औंधमधील पन्नास वर्षांच्या पुरुषाचा मृत्यू झाला आहे. त्यालाही काही आजार होते.
शहरात आतापर्यंत ६४ हजार ४४४ नागरिकांच्या घशातील द्रव पदार्थांच्या नुमन्यांची तपासणी करण्यात आली. त्यातील आठ हजार ५०९ लोकांना कोरोना झाला आहे.
पिंपरीत आढळले आणखी ८८ रुग्ण
पिंपरी - शहरात बुधवारी (ता. १०) रात्री आठपर्यंत ८८ जणांना संसर्ग झाल्याचे आढळून आले, त्यामुळे एकूण बाधित रुग्णांची संख्या ९३० झाली आहे. सध्या रुग्णालयात ४०७ जण उपचार घेत आहेत. ५०७ जण बरे झाले आहेत. आजपर्यंत १६ जणांचा मृत्यू झाला आहे. बुधवारी पॉझिटिव्ह आढळलेले रुग्ण कस्पटेवस्ती वाकड, आनंदनगर चिंचवड, सद्गुरू कॉलनी वाकड, जयरामनगर सांगवी, खंडोबामाळ भोसरी, चऱ्होली, रमाबाईनगर पिंपरी, विजयनगर काळेवाडी, अजंठानगर आकुर्डी, दिघी, मोरेवस्ती चिखली, अशोकनगर चिखली, साईबाबानगर, पिंपळे सौदागर, बालाजीनगर भोसरी, नढेनगर काळेवाडीतील रहिवासी आहेत. न्यू दत्तनगर वाकड येथील ८५ वर्षीय पुरुष व चऱ्होलीतील ६५ वर्षीय महिलेचा बुधवारी मृत्यू झाला. तसेच, आनंदनगर चिंचवड स्टेशन, भोसरी, दापोडी, नवी सांगवी, इंदिरानगर चिंचवड, साईबाबानगर चिंचवड, भीमनगर, भारतमातानगर व नेहरूनगर येथील रहिवासी असलेल्या २२ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.