Cm-Uddhav-Thackeray
Cm-Uddhav-Thackeray 
पुणे

पुण्यातील कंटेन्मेंट झोनबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय म्हणाले पाहा

सकाळ वृत्तसेवा

पुणे : पुण्यातील लॉकडाउनमध्ये शिथिलता आणताना बाधित क्षेत्रातही (कंटेन्मेंट) काही सवलती देण्याचे संकेत महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिले होते; मात्र, अशा बाधित क्षेत्रात व्यवहार सुरू करणे परवडणार नसल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी (ता.१८) रात्री स्पष्ट केले. त्यामुळे पुण्यातील ६९ जुन्या आणि नियोजित कंन्टेंमेट झोनमध्ये आता कोणत्याही सवलती राहणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

पुण्यातील बाधित क्षेत्र वगळता अन्य भागांत व्यवहार काही प्रमाणात सुरू करण्यात आले आहेत. तेव्हाच, बाधित क्षेत्रातील ६९ पैकी २४ भागांत गेल्या पंधरा दिवसांत एकही रुग्ण सापडलेला नाही. त्यात रुग्ण बरे होणाऱ्याचे प्रमाण वाढल्याने या भागांत सध्या अॅक्टिव्ह पेशंटची संख्या फार कमी आहे. त्यामुळे चौथ्या टप्प्यातील लॉकडाउनमध्ये बाधित क्षेत्र काही प्रमाणात कमी करून नव्याने काही जोडण्यात येईल, असे गायकवाड यांनी सांगितले.

तसेच, बाधित क्षेत्रातही काही व्यवहार सुरू करता येतील का, याचा आढावा घेत आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले होते. या भागातील नेमक्या कोणत्या सुविधा मिळतील, याची उत्सुकता होती. मात्र, मुख्यमंत्री ठाकरे यांनी बाधित क्षेत्रात काहीही सुरू करता येणार नसल्याचे सांगत, तसे झाल्यास ते परवडणारे नाही, हे स्पष्ट केले. त्यामुळे पुण्यातील बाधित क्षेत्रातील बंधने कायम राहणार आहेत; किंबहुना काही प्रमाणात कठोर पावलेही उचलली जाण्याची शक्यता आहे, हेच मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलेल्या भीतीतून पुढे आले आहे. 

दरम्यान, पुण्यात सलग दोन दिवस दोनशेचा टप्पा ओलांडलेली कोरोना रुग्णांची संख्या सोमवारी मात्र निम्म्याने कमी झाली असून, दिवसभरात १०२ नवे सापडले आहेत. ४९ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, विविध रुग्णालयांतील पाच रुग्णांचा मृत्यू झाल्याने त्यांची संख्या दोनशेच्या घरात पोचली आहे. गंभीर बाब म्हणजे, २० वर्षांच्या एका महिलेचा बळी गेला आहे.

दरम्यान, विविध रुग्णालयांतील १४८ रुग्णांची प्रकृती गंभीर असून, त्यातील ५० रुग्ण व्हेंटिलेटरवर असल्याचे महापालिकेच्या आरोग्य खात्याने स्पष्ट केले. सध्या विविध रुग्णालयांत १ हजार ५९९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

गेल्या दोन दिवसांत रुग्ण वाढीचा वेग पाहता नव्या रूग्णांची मोठ्या प्रमाणात भर पडण्याची भीती आहे. तर दिवसभरात १०२ रुग्ण आढळून आल्याची नोंद आहे.

पुण्यात आतापर्यंत सुमारे ३२ हजार २३६ नागरिकांच्या घशातील द्रव पदार्थांच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. त्यातील ३ हजार ५९८ जणांना कोरोनाची लागण झाल्याची नोंद आहे. मात्र, त्यातील १९९ रुग्ण मरण पावले आहेत; तर १ हजार ८०० रूगण कोरोनामुक्त झाल्याने ते आपापल्या घरी गेले आहे. त्याशिवाय, १४८ रुग्णांची स्थिती गंभीर आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: चाकण-शिक्रापूर मार्गावर गॅस टँकरचा भीषण स्फोट! परिसर हादरला; घरांची मोठी पडझड, पाहा व्हिडीओ

पुण्यासह पाच रेल्वे स्टेशन बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणाऱ्याला बेड्या

Virat Kohli : इम्पॅक्ट खेळाडूच्या नियमावर विराटचीही टीका;सामन्याचा समतोल बिघडत असल्याचे व्यक्त केले मत

VIDEO: आरसीबी प्लेऑफमध्ये जाताच विरुष्काचं भन्नाट सेलिब्रेशन; व्हिडीओनं वेधलं साऱ्यांचे लक्ष

शेतीवर कर्ज घेणारा शेतकरी झाला अब्जाधीश! खात्यात आले ९९ अब्ज रूपये, रक्कम पाहून बँकेसह खातेधारकाला बसला धक्का

SCROLL FOR NEXT