They are serving to corona infected patients by wearing PPE kit for 10 to 15 hours 
पुणे

अंगात प्रोटेक्टिव किट घातलं की, पाणी पिणंही अवघड!

सकाळवृत्तसेवा

पुणे :अगदी पायापासून डोक्यापर्यंत झाकलं जाईल असं प्रोटेक्टिव किट घालणं... अन् तेही काही मिनिटांसाठी नव्हे बरं तर तब्बल दहा-बारा तास अगदी ड्यूटी संपेपर्यंत...बरं हे किट एकदा घातलं की सारखं काढ-घाल करणं शक्य नसतं त्यामुळे पाणी पिणं, काही खाणं जरा अवघडच, असा अनुभव कोरोनाग्रस्तांची  प्रत्यक्ष सेवा करणारे घेत आहेत.  त्यातील एक परिचारिका म्हणून सेवा करणाऱ्या सुवर्णा नाझरेकर.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
नाझरेकर या पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण मेमोरियल रूग्णालयात परिचारिका म्हणून गेल्या २५ वर्षांपासून कार्यरत आहेत. त्यांच्याप्रमाणेच सध्या कोरोनाग्रस्तांची सेवा करणारे सर्वच डॉक्टर, परिचारिका आणि संलग्न कर्मचारी  असा अनुभवत घेत आहेत. कोरोनाचा संसर्ग होऊ लागला, त्यावेळी कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांसाठीच्या अति दक्षता विभागात (आयसीयू) नाझरेकर या काही दिवस कार्यरत होत्या. त्यावेळी कोरोनाग्रस्तांच्या रक्ताची तपासणी, त्यांना इंजेक्शन देणे, सलाइन लावणे, स्वॉब घेणे तसेच डॉक्टरांसोबत जाणे, रुग्णांच्या जेवणाची आणि पाण्याची व्यवस्था पाहणे, अशा कामांची जबाबदारी त्यांच्यावर होती. रुग्णालयात आळीपाळीने कामांच्या जबाबदाऱ्या दिल्या जातात. काही दिवसांची अति दक्षता विभागातील जबाबदारी संपल्यानंतर आता नाझरेकर यांच्यावर कोरोनाच्या प्राथमिक तपासणीसाठी येणाऱ्या रूग्णांच्या वॉर्डमधील जबाबदारी आहे.

पुण्याच्या आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
नाझरेकर म्हणतात, "रुग्णांची सेवा हिच खरी ईश्वर सेवा, असे मानत मी गेली २५ वर्षे काम करत आहे. आतापर्यंत एचआयव्ही, कर्करोग, स्वाईन फ्लू अशा आजारी ग्रस्त रुग्णांची सेवा करण्याची संधी मिळाली. त्यामुळे कोरोना वॉर्डमधील रुग्णांची सेवा करण्याची माझी इच्छा होती. आणि तीही संधी मला अनुभता येत आहे. मात्र आता घरातील सगळी कामे आवरुन एकदा कामाला गेल्यावर पुन्हा घरी येईपर्यंत कोणाशीही संपर्क साधता येत नाही. प्रोटेक्टिव किट घालून तासन् तास काम करावे लागत आहे. हे पीपीई किट सातत्याने काढ-घाल केल्यास कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता असते. म्हणूनच आपल्याला आणि आपल्यामुळे इतरांना कोरोना होऊ नये म्हणून अतिरिक्त खबरदारी घ्यावी लागते."

Coronavirus : पिंपरी-चिंचवड महापालिकेचा लढा ‘वॉर रूम’मधूनही

परंतु काळजी करण्याचे कारण नाही. कोरोनाचा वाढता संसर्ग आटोक्यात आणण्यात आपल्याला निश्चितच यश येणार आहे. आम्ही सदैव तुमच्या सेवेसाठी तप्तर आहोत." अशा शब्दात व्यक्त होत नाझरेकर यांनी भावनांना मोकळी वाट करून दिली.

ऑनलाईन व्यवहार नाही तरी, बँक खात्यातून पैसै गायब: सायबर पोलिसांनी मिळवून दिले परत
"स्वताच्या जिवाची पर्वा न करता, आम्ही सर्व रुग्णालयातील कर्मचारी तुमच्यासाठी सदैव तत्पर आहोत. यापुढेही २४ तास ड्युटीही लागण्याची शक्यता आहे. आणि आम्ही ती ही तुमच्यासाठी करू. पण तुम्हीही स्वतःची काळजी  घेतली पाहिजे. सरकारतर्फे देण्यात येणाऱ्या सूचनांप्रमाणे तुम्ही वागणे आवश्यक आहे. कुणीही घराबाहेर पडू नये."
- सुवर्णा नाझरेकर, परिचारिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यात मध्यरात्री घायवळ गँगचा धुमाकूळ; गोळीबारात एक जण गंभीर जखमी, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

माेठी बातमी! 'शिरवळमध्ये भरदिवसा गाेळीबार'; घटना सीसीटीव्‍हीत कैद, तिघांना अटक, सातारा जिल्ह्यात खळबळ, नेमकं काय घडलं..

Chh. Sambhajinagar Accident : माळीवाडा पुलावर भीषण अपघात, भरधाव कंटेनरखाली दुचाकीस्वाराचा जागीच मृत्य

सरकारचा मोठा निर्णय! आरोग्य विभागाच्या आदेशानुसार ‘या’ लाखो लोकांचे जन्म-मृत्यू दाखले रद्द होणार आणि पोलिसांकडून दाखले जप्त होणार, नेमका आदेश काय?, वाचा...

Swami Samarth: स्वामी समर्थ महाराज स्वत: आशीर्वाद देताना... AI VIDEO व्हायरल, दर्शन चुकवू नका

SCROLL FOR NEXT