Pune_Crime 
पुणे

काय म्हणावं या चोरट्यांना; चंदनाच्या झाडांसाठी भेदली 'एनडीए'ची संरक्षण यंत्रणा!

सकाळ वृत्तसेवा

पुणे : भारतीय लष्कराच्यादृष्टीने महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या (एनडीए) प्रतिबंधीत क्षेत्रात प्रवेश केलेल्या चोरट्यांनी तब्बल 12 चंदनाची झाडे तोडून चोरुन नेली. याप्रकरणी उत्तमनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

संजय मोरे (वय 53, रा.कोपरे, एनडीए रस्ता) यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरुन अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी मोरे हे 'एनडीए'मध्ये सुरक्षारक्षक म्हणून कार्यरत आहेत. एक ते 21 ऑगस्ट या कालावधीत चोरट्यांनी एनडीए खडकवासला संस्थेच्या प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी आतमध्ये असलेली चंदनाची तब्बल 12 झाडे तोडून चोरुन नेली.

हा प्रकार 21 ऑगस्ट रोजी सुरक्षा रक्षकांच्या निदर्शनास आला. त्यावेळी त्यांनी संबंधीत घटनेबाबत एनडीएच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगितले. त्यानंतर उत्तमनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. 'एनडीए'सह खडकी आणि अन्य भागात असणाऱ्या लष्करी संस्थांच्या आवारातील चंदनाची झाडे तोडून नेण्याचे प्रकार सातत्याने घडत आहेत. या घटनेमुळे लष्करी संस्थांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chhatrapati Sambhajinagar crime control: दहशत माजवणाऱ्या संदिप फटाकडेला छ. संभाजीनगर जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार

Marathi News Live Updates : माढ्यात सीना नदीत ५ तरुण बुडाले

Sugarcane Mechanization: ऊसतोड मजुरांच्या मनमानीला कंटाळून शेतकऱ्यांचा यंत्रांकडे मोर्चा; आधुनिक हार्वेस्टरमुळे वेळ व खर्चात बचत

Banjara ST reservation protest: येलदरी जलाशयात बंजारा समाजाचे जलसमाधी आंदोलन; विनोद आडे यांच्या आमरण उपोषणाला व्यापक पाठिंबा

Manwat Health Services Review: सुट्टीच्या दिवशी आरोग्य सुविधांची तपासणी; महालक्ष्मी सणात महिला कर्मचाऱ्यांची ड्युटीमुळे तारांबळ

SCROLL FOR NEXT