thieves left board to return back Stolen Scorpio to the original owner at koregav bhima 
पुणे

''ही गाडी मूळ मालकाला परत द्या'', चोरलेल्या स्कॉर्पिओत चोरट्यांचा 'मेसेज'

सकाळवृत्तसेवा

कोरेगाव भीमा : ''अगदी नियोजनबद्ध रीतीने चोरटे स्कॉर्पिओ गाडीची चोरी करुन गाडीची फोडलेली काचही रात्रीत पुन्हा बसवली जाते. गाडीचे ईसीयु व जीपीएस यंत्रणा काढून तसेच गाडीत मूळ मालकाचा पत्ता लिहून गाडी त्यांना परत मिळावी, असाही बोर्ड लिहून चोरटे स्कॉर्पिओ गाडी सोडून जातात. कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथील या आश्चर्यकारक घटनेत मुळ मालकाला मात्र, ''गाडी मिळाल्यांच्या आनंदाबरोबरच चोरट्यांनी या स्कॉर्पिओचा वापर एखाद्या गुन्ह्यात तर केला नसेल ना''अशीही भिती आहे. तर या प्रकाराचा शिक्रापूर पोलिसही कसून शोध घेत आहेत.  

कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथे दोन दिवसापूर्वी चोरट्यांनी बुधवारी (ता. ७) पहाटे काच फोडून चोरून नेलेली विजयराज ट्रॅव्हल्सची स्कॉर्पिओ जीप (क्र. एम.एच. १२ एस. एफ. १८८७) गुरुवारी (ता. ८) रात्री अहमदनगर जिल्ह्यामध्ये आढळून आली. चोरट्यांनी या स्कॉर्पिओ जीपमध्ये मोठ्या कागदावर ही गाडी कोरेगाव भीमा येथून चोरलेली असून मूळ मालकाला परत मिळावी असा संदेश लिहून ठेवल्यामुळे या जीपचा तपास लागला असून या विचित्र प्रकाराने पोलीस प्रशासनही चक्रावून गेले आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

याप्रकरणी वाहन चालक गणेश गुलाबराव जाधव (रा. कोरेगाव भीमा, ता. शिरूर) यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार शिक्रापूर पोलिसांनी अज्ञात आरोपींवर गुन्हाही दाखल केला होता. त्यानंतर मालक विजय गव्हाणे व शिक्रापूर पोलिस जीपचा शोध घेत होते.

दरम्यान 8 ऑक्टोबरला रात्री अहमदनगर जिल्ह्यातील कोतवाली पोलिस स्टेशनचे पोलिस रात्री गस्त घालत असताना त्यांना रस्त्याच्याकडेला एक स्कॉर्पिओ गाडी संशयितरित्या दिसून आली. यावेळी पोलिसांनी स्कॉर्पिओ जवळ जाऊन पाहणी करत दरवाजा उघडला असता त्या स्कॉर्पिओमध्ये एक मोठा पुठ्याचा कागद दिसून आला व त्या कागदावर ही गाडी कोरेगाव भीमा पुणे पोलीस स्टेशन येथून चोरली असून ती मूळ मालकाला परत मिळावी, असा फलक लिहिलेला दिसून आला. त्यामुळे अहमदनगर पोलिसांनी शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे फोन करून याबाबत चौकशी केली असता ती गाडीची कोरेगाव भीमा येथून चोरी झाली असल्याचे समोर आले. त्यानंतर शिक्रापूर पोलिस स्टेशनचे पोलीस नाईक योगेश नागरगोजे, संतोष शिंदे यांनी कोतवाली पोलिस स्टेशन येथे जात पाहणी केली असता ही गाडी कोरेगाव भीमा येथून चोरी गेली असल्याचे स्पष्ट झाले. 

डीएसके प्रकरण : उलाढालीचा रिपोर्ट अडकला लालफितीत; तपास यंत्रणेकडून दिरंगाई

स्कॉर्पिओची पाहणी केली असता गाडीतील महागडे ईसीयु युनिट, टेपरेकॉर्डर, जीपीएस यंत्रणा आदी पार्ट चोरट्यांनी चोरून नेले असल्याचे समोर आले. चोरटे गाडीचे सर्वच पार्ट काढून विकू शकले असते. मात्र, तसेच न करता इतक्या महागड्या गाडीची चोरी करूनही चोरट्यांनी मुळ मालकाच्या नावाचा बोर्ड लिहून त्यांना गाडी परत मिळावी, असा संदेश पोलिसांना संदेश दिल्याने वाहनमालक तसेच पोलिसही चक्रावले आहेत. 

चोरट्यांनी या स्कॉर्पिओचा वापर एखाद्या गुन्ह्यात तर केला नसेल ना, अशीही शंका त्यांना वाटत आहे. कारण या जीपची चोरी करताना चोरट्यांनी आणखी एका मोटारीचा वापर करीत नेमके याच जीपजवळ येत चोरी केल्याचे सीसीटिव्हीत निदर्शनास आले असून गाडीची फोडलेली काचही त्याच रात्री ओरीजनल बसवल्याचे व गाडीतील जीपीएस यंत्रणाही जागेवरच बंद केल्याचे निदर्शनास आले असल्याचे वाहनमालक माजी सरंपच विजय गव्हाणे यांनी सांगितले. त्यामुळे हे चोरटे हायटेक असावेत, अशी शंका असून आता या हायटेक चोरीचा तपासही हायटेक पद्धतीने होवून शिक्रापूर पोलिस चोरट्यांपर्यंत पोहोचतात का ? याची सर्वांना उत्सुकता आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rishabh Pant record: धडाकेबाज रिषभ पंतने लॉर्ड्सवर रचला इतिहास!, सर विव रिचर्ड्स यांचा 'हा' विक्रम मोडला

छत्रपती शिवरायांचा इतिहास जगभर पोहोचणार, UNESCO यादीत पन्हाळगडाचा समावेश; पालकमंत्र्यांनी 'या' घटनेची करुन दिली आठवण

Latest Marathi News Updates : उल्हासनगर स्मशानभूमीत डॉ. आंबेडकरांचा पुतळा; अनुयायांमध्ये संतापाची लाट

Crime News : नाशिक रोडवरील चोरट्यांनी आर्मी नर्सिंग परीक्षेला आलेल्या उमेदवाराला लुटले; एक लाख पाच हजारांचा ऐवज जप्त

Radhika Yadav Murder Case: राधिका यादव हत्याकांडात नवी ट्विस्ट!, टेनिस अकादमीबद्दल पोलिसांनीच केला मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT