pistol Sakal
पुणे

चोरट्यांनी पळविले माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांचे पिस्तुल

चोरट्यांकडून आत्तापर्यंत भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी (आयएएस), विद्यमान आमदार, माजी पोलिस महासंचालकांपासून ते आजी-माजी अधिकाऱ्यांच्या घरी चोरी करण्याचे धाडस केले आहे.

सकाळ वृत्तसेवा

चोरट्यांकडून आत्तापर्यंत भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी (आयएएस), विद्यमान आमदार, माजी पोलिस महासंचालकांपासून ते आजी-माजी अधिकाऱ्यांच्या घरी चोरी करण्याचे धाडस केले आहे.

पुणे - चोरट्यांकडून (Thieves) आत्तापर्यंत भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी (आयएएस), विद्यमान आमदार, माजी पोलिस महासंचालकांपासून ते आजी-माजी अधिकाऱ्यांच्या घरी चोरी (Theft) करण्याचे धाडस केले आहे. अन्य चोरीच्या गुन्ह्यांप्रमाणेच पोलिसांकडून "व्हिआयपीं'च्या घरी झालेल्या चोरीचाही तितकाच संथगतीने तपास केला, किंवा तपास केलाही नाही. असे असतानाच आता चोरट्यांनी थेट माजी गृहराज्यमंत्री व कॉंग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे (Ramesh Bagwe) यांचे पिस्तुल (Pistol) चोरी करण्यापर्यंत मजल मारली.

माजी गृहराज्यमंत्री व कॉंग्रेसचे विद्यमान शहराध्यक्ष रमेश बागवे भवानी पेठेत राहतात. बागवे यांच्याकडे अधिकृत परवाना असलेली राखाडी-काळ्या रंगाची व सहा राऊंडची "मेड इन इंग्लड'ची पिस्तुल आहे. तिची किंमत एक लाख रुपये असून त्यामध्ये पाच जिवंत काडतुसे होती. बागवे यांनी हि पिस्तुल त्यांच्या कारमधील चालकाशेजारील सीटच्या पाठीमागील बाजुस असलेल्या कप्प्यामध्ये ठेवली होती. दरम्यान, पिस्तुल 25 ते 27 डिसेंबर या कालावधीमध्ये भवानी पेठेतील लोहियानगर ते अरुणकुमार वैद्य स्टेडीयम येथे या दरम्यान ते नेहमी प्रवास करीत असताना चोरट्यांनी त्यांच्या कारचा पाठीमागचा दरवाजा उघडून पिस्तुल चोरी केले. बागवे यांनी याबाबत तत्काळ खडक पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यावरुन पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला.

आमदार माधुरी मिसाळ यांच्याही घरी एक वर्षापुर्वी चोरी झाली होती.त्यामध्ये चोरट्यांनी त्यांच्या वहिनींच्या लाखो रुपयांचे दागिने चोरुन नेले होते. याप्रकरणी वानवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होता. मात्र, या गुन्ह्यात पुढे काही झाले नाही. यावर्षी लक्ष्मीपुजनाच्या पहाटे मुंढवा येथे "आयएएस' अधिकाऱ्याच्या घरी चोरट्याने तब्बल 43 लाख रुपयांचे दागिने, रोख रक्कम चोरुन नेली होती. कोंढवा येथील एका उच्चभ्रु सोसायटीतील निवृत्त पोलिस महासंचालकांच्या सदनिकेमध्येही चोरट्यांनी चोरी केली होती. सर्वसामान्यांबरोबरच "व्हिआयपीं' व्यक्तींनाही चोरट्यांकडून वारंवार हिसका दाखविला जात आहे, असे असूनही चोरट्यांच्या मुसक्‍या आवळण्याचा मात्र पोलिसांकडून ठोस प्रयत्न होत नसल्याची सद्यस्थिती आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra weather : उत्तर भारतात शीत लहर, राज्यात थंडीचा कडाका वाढला वर्षाखेरीसपर्यंत हुडहुडी कायम राहणार

Personal Loan: जर वैयक्तिक कर्ज घेणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर कर्ज कोणाला फेडावे लागेल? पर्सनल लोनचे 'हे' नियम तुम्ही वाचलेत का?

Drugs Racket : बंगळूरमधील ड्रग्जचे कारखाने उद्ध्वस्त; आंतरराज्यीय रॅकेटचा पर्दाफाश

Latest Marathi News Update: मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समधील पहाटेची दृश्ये

China Railway Speed : दोन सेकंदांतच रेल्वेचा वेग ताशी ७०० किमीवर; चीनमध्ये ‘मॅगलेव्ह’ तंत्रज्ञानाची किमया

SCROLL FOR NEXT