Crime_Thief
Crime_Thief 
पुणे

पेस्ट कंट्रोलमुळे घराला ठोकले टाळे अन् चोरट्यांनी 21 लाख पळवले

सकाळ वृत्तसेवा

पुणे : खबरदारीचा उपाय म्हणून पेस्ट कंट्रोल केल्यानंतर घर कुलूप लावून बंद करणे ढोले-पाटील रस्ता परिसरात राहणा-या व्यावसायिकाला भलतेच महागात पडले आहे. व्यावसायिक घराला कुलूप लावून फार्मा हाऊसवर गेल्यानंतर चोरट्यांनी त्यांच्या सदनिकेत डल्ला मारला.

यामध्ये सोन्या-चांदीचे दागिने, हिऱ्याचा हार आणि रोख रक्कम असा 21 लाख 16 हजाराचा ऐवज चोरून नेण्यात आला. या प्रकरणी शंतनू गणेशराव ढोले-पाटील (वय 39, रा. ढोले-पाटील रस्ता) यांनी कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शंतनू यांनी 7 डिसेंबरला घरात पेस्ट कंट्रोल केले होते. यामुळे ते घर बंद करून तळेगाव येथील फार्म हाऊसवर रहायला गेले. दुसऱ्या दिवशी घर उघडले असता, त्यांना घरात चोरी झाल्याचे लक्षात आले. चोरटे घराचा मुख्य दरवाजा उचकटून आत घुसले होते. घरात असलेले रोख दोन लाख रुपये, सोने व चांदी आणि हिऱ्यांच्या दागिन्यांवर चोरट्यांना हात साफ केला.

त्यामुळे या बाबत त्वरित पोलिस ठाणे गाठून फिर्याद दिली. त्यानंतर घटनास्थळी कोरेगाव पार्क पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रमोद पत्की यांनी भेट दिली. त्यांनी घटनास्थळाची तपासणी केली. पोलिस उपनिरीक्षक रूपेश चाळके या गुन्ह्याचा तपास करीत आहेत. चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पोलिस परिसरातील सीसीटीव्ही तपासत आहेत.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'पवित्र ग्रंथ गुरु साहिब'ची पानं गुरुद्वारात घुसून फाडली! जमावाच्या बेदम मारहाणीत तरुणाचा मृत्यू

Nick Jonas: देसी गर्ल प्रियांका चोप्राचा पती निक जोनासची तब्येत बिघडली; व्हिडीओ शेअर करत म्हणाला...

Job Discrimination : मुंबईत नोकरी, पण मराठी माणसालाच नो एन्ट्री? लिंक्डइनवरील पोस्ट होतेय व्हायरल

Samruddhi Accident: समृद्धी महामार्गावरील अपघात कधी थांबणार? कारला मागून धडक दिल्याने तिघांचा मृत्यू

Bhavesh Gupta:'पेटीएम'च्या अध्यक्षांचा कंपनीला रामराम, तडकाफडकी घेतला करिअर ब्रेकचा निर्णय

SCROLL FOR NEXT