पुणे : कोरोनाच्या संसर्गामुळे मेडिकलचा व्यावसाय चांगला होत असून त्यांच्याकडे दररोज भरपूर रोख रक्कम येत असल्यामुळे थेट मेडिकलवरच दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या चोरट्यांना गुन्हे शाखेच्या युनीट एकच्या पथकाने अटक केली.
अजय बाबु ओव्हाळ (वय 30), शुभम सुनील शिंदे (वय 24), विनायक महादेव कांबळे (वय 28, तिघेही रा. कात्रज) अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. तर त्यांचे दोन साथीदार पंकज लवटे आणि रामा लवटे हे दोघे पळून गेले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाच्या संसर्गामुळे सध्या मेडिकल व्यवसाय तेजीत सुरू आहे. त्यामुळे मेडीकलमध्ये दररोज रोख रक्कम मोठ्या प्रमाणात जमा होते. त्यामुळे पाच ते सहा जण तळजाई टेकडी येथे मेडिकलवर दरोडा टाकण्याच्या तयारीत असून त्यांच्याकडे धारदार शस्त्रे असल्याची खबर पोलिस कर्मचारी अजय थोरात आणि अशोक माने यांना मिळाली.
त्यानुसार, वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील ताकवले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक संजय गायकवाड, हनुमंत शिंदे, सुनील कुलकर्णी यांच्यासह सहकारनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरुण वायकर, पोलिस उपनिरीक्षक बापू खेंगरे यांच्या पथकाने घटनास्थळी सापळा रचून आरोपींना अटक केली. पोलिसांनी त्यांच्याकडून दोन धारदार तीन फूट लांबीच्या पालघन, मिरची पावडर, मोबाईल, दुचाकी असा 64 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
पोलिसांनी आरोपींकडे चौकशी केली, त्यावेळी संबंधीत आरोपींनी सहकारनगर येथील एका मेडिकलवर दरोडा टाकण्याचे नियोजन केले होते. त्यानुसार ते एकत्र जमले होते. तत्पूर्वी पोलिसांनी त्यांना अटक केली. आरोपी अजय ओव्हाळ याच्याविरुद्ध भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात तीन गंभीर गुन्हे दाखल आहेत. तसेच सरकारी नोकरावर हल्ला करुन जखमी केल्याचा एक असे चार गुन्हे दाखल आहेत. तर विनायक कांबळेविरुद्ध हडपसर पोलिस ठाण्यात एक गुन्हा दाखल आहे.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
(Edited by : Ashish N. Kadam)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.