Oxygen corona third wave
Oxygen corona third wave sakal
पुणे

Pune : तिसऱ्या लाटेत ऑक्सिजनचा तुटवडा नाही

सकाळ वृत्तसेवा

पुणे : शहर आणि जिल्ह्यात पुन्हा कोरोना बाधित (covid-19) रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. रुग्णांवर उपचारासाठी ऑक्सिजनची (Oxygen) मागणी वाढल्यास कठोर निर्बंध (Restriction) लावावेत, असे निर्देश राज्य सरकारने (State Government) दिले आहेत. दरम्यान, सध्या शहर आणि जिल्ह्यात ऑक्सिजनची मागणी ८० मेट्रिक टनांवर पोचली आहे. तर, जिल्ह्यात ऑक्सिजन साठवणूक क्षमता एक हजार २६ टन इतकी आहे. त्यामुळे सध्या कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत (corona third wave) ऑक्सिजन आणि त्याची साठवणूक क्षमता पुरेशी आहे.

२० एप्रिल २०२१ चा दिवस. यादिवशी कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी सर्वाधिक ३६३.२ मेट्रिक टन ऑक्सिजनचा वापर झाला. या दिवशी रुग्णांची संख्या एक लाख एक हजारांवर पोचली होती. पुण्यासह रायगड आणि परराज्यांतून ऑक्सिजन मागवावा लागला. मागणी वाढल्यामुळे १२ मे रोजी ओडिशा येथून रेल्वेद्वारे ऑक्सिजन टॅंकर मागविण्यात आले होते. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने ऑक्सिजन निर्मिती आणि साठवणूक क्षमता वाढविण्यावर भर दिला होता.

नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे ऑक्सिजनच्या मागणीतही घट झाली. परंतु पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून, मागील १२ जानेवारीला ऑक्सिजनची मागणी ८० टनांपर्यंत पोचली आहे.

जिल्हा प्रशासनाने एक हजार २६ टन ऑक्सिजनची साठवणूक क्षमता निर्माण केली आहे. जिल्ह्यात ६५ लिक्विड टॅंक ऑक्सिजन प्रकल्प आहेत. त्यांची एकूण साठवणूक क्षमता ९९३ मेट्रिक टन इतकी आहे. त्यापैकी ३९ प्रकल्प कार्यान्वित असून, सध्याची ऑक्सिजन साठवणूक क्षमता ६९५ मेट्रिक टन आहे. तर, ६२ हवेतून ऑक्सिजन निर्मिती करणारे म्हणजे प्रेशर स्विंग एडसोर्पशन (पीएसए) ऑक्सिजन प्लांटची क्षमता सुमारे ७१ मेट्रिक टन असून, सध्या ४५ ‘पीएसए’ प्लांटची प्रतिदिन ४८ मेट्रिक टन क्षमता आहे.

विभागीय आयुक्तालयात विशेष कक्ष

ऑक्सिजनचा तुटवडा भासू नये, यासाठी विभागीय आयुक्तालयात विशेष कक्ष सुरू करण्यात आला होता. विभागीय आयुक्त सौरभ राव आणि जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, अन्न व औषध प्रशासन आणि इतर विभागांचे वरिष्ठ अधिकारी परिस्थितीवर लक्ष ठेवून होते. अनेकदा ऑक्सिजन उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागत होती. परंतु प्रशासनाच्या योग्य नियोजनामुळे ऑक्सिजनचे मोठे संकट टळले होते.

पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन

ऑक्सिजनचा तुटवडा भासू नये, यासाठी खासगी प्लांटसोबतच रुग्णालये आणि साखर कारखान्यांनीही ऑक्सिजन निर्मिती आणि साठवणूक प्रकल्प सुरू केले आहेत. त्यामुळे पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन उपलब्ध होणार आहे. तथापि वाहतूक आणि सिलिंडरची कमतरता दूर करण्यासाठी नियोजन करण्यात येत असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

ऑक्सिजन साठवणूक टॅंक क्षमता आणि कंसात ‘पीएसए’ प्लांट क्षमता (मेट्रिक टनमध्ये)

  • पुणे महापालिका २१६ (३०.५)

  • पिंपरी चिंचवड महापालिका १९३ (११.३)पुणे ग्रामीण २५१ (२९.८)

  • खासगी ३३२

  • एकूण क्षमता १०२६

'कोरोनाची लाट नसताना दररोज सुमारे ७० टन ऑक्सिजनची गरज भासते. तथापि रुग्णालयांना ऑक्सिजन उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून योग्य नियोजन करण्यात आले आहे. ऑक्सिजन साठवणूक क्षमता आणि ‘पीएसए’ ऑक्सिजन प्लांटचीही संख्या वाढविण्यात आली आहे.'

- डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kiran Sarnaik: आमदार किरण सरनाईक यांच्या कुटुंबातील ४ जणांचा अपघातात मृत्यू! पातूरमध्ये भीषण अपघात

Pune Traffic Update: उद्यापासून पुणे वाहतुकीत गर्डर लॉचिंग कामामुळे मोठे बदल, कोणते असतील पर्याय मार्ग?

Kapil Sharma : 'द ग्रेट इंडियन कपिल शो'साठी कपिल शर्मा घेतो 'इतकं' मानधन !

Chitra Wagh: "चित्रा वाघ यांनी माफी मागावी अन्यथा..."; 'पॉर्नस्टार' प्रकरणावर अभिनेत्याचा गंभीर इशारा

RBI: गुंतवणूकदार मालामाल! रिझर्व्ह बँकेचा एक निर्णय अन् कंपनीचे शेअर्स तुफान तेजीत

SCROLL FOR NEXT