Mohol_Sule 
पुणे

Mohol Vs Sule: "सोन्याचा चमचा घेऊन जन्मलेल्यांना..."; खासदार मुरलीधर मोहोळांची सुप्रिया सुळेंवर सडकून टीका

पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांची नुकतीचं केंद्रीय मंत्रीमंडळात वर्णी लागली असून त्यांना राज्यमंत्रीपद देण्यात आलं आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

पुण्याचे नवनिर्वाचित खासदार मुरलीधऱ मोहोळ यांनी बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर सडकून टीका केली आहे. आपल्यासारख्या सोन्याचा चमचा घेऊन जन्मलेल्यांच्या हे पचणी पडणारं नाही, अशा शब्दांत मोहोळ यांनी सुळे यांना टार्गेट केलं आहे. मोहोळ यांना मंत्रीपद मिळाल्यानंतर त्याचा फायदा ठेकेदारांना व्हायला नको, अशी घणाघाती टीका सुप्रिया सुळे यांनी केली होती. त्याला प्रत्युत्तर देताना मोहोळ यांनी ट्विट केलं आहे. (those born with a golden spoon Pune MP Muralidhar Mohol criticizes Supriya Sule)

मोहोळ यांनी ट्विट करत सुप्रिया सुळे यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यांनी म्हटलं की, मा. सुप्रियाताई, शुभेच्छांबद्दल आपले मनःपूर्वक धन्यवाद!

खरं तर जवळपास ४० वर्षांनंतर जनतेतून निवडून आलेल्या पुण्याच्या खासदाराला मंत्रीपदाची संधी मिळाली, ही बाब समस्त पुणेकरांना गौरवान्वित करणारी आहे आणि पुण्याची राजकीय संस्कृती पाहिली तर यांचं निखळ मनानेच स्वागत अपेक्षित होतं. असो, पण या निमित्तानं आपल्या कोत्या मनोवृत्तीचं दर्शनही पुणेकरांना घडलं.

ताई, आपली ‘मळमळ’ आम्ही समजू शकतो. माझ्यासारख्या सामान्य घरातील कार्यकर्त्याला थेट केंद्रीय मंत्रीपदावर संधी मिळणे, हे आपल्यासारख्या सोन्याचा चमचा घेऊन जन्मलेल्यांना लवकर पचणी पडणारे नाही. त्यामुळं आपली टिपण्णी स्वाभाविक मानतो.

उरला प्रश्न ठेकदारांचा,

तर ठेकेदार कोणी पोसले? कोणी मोठे केले? पुण्यातील आणि महाराष्ट्राचे मोठे ठेकेदार कोणाचे पार्टनर आहेत? हे अवघ्या महाराष्ट्राला माहिती आहे. त्यामुळे असल्या तकलादू टिपण्णी करुन स्वतःचं हसं सोडून दुसरं काही होणार नाही.

सुप्रिया सुळे काय म्हणाल्या होत्या?

पहिल्यांदाच खासदार बनलेल्या मुरलीधर मोहोळ यांना पहिल्याच टर्ममध्ये मंत्रीपदाची लॉटरी लागल्यानं सुप्रिया सुळे यांनी त्यांच्यावर खोचक टीका केली होती. पुण्याला मिळालेल्या मंत्रीपदाचा फायदा पुणेकरांना व्हायला हवा ठेकेदारांना नको, असं सुळे यांनी म्हटलं होतं. पुण्यातील रोजगाराचं हब असलेल्या हिंजवडी आयटीपार्कमधून ३५ ते ४० कंपन्या बाहेर पडल्यावरुन सुळे यांनी मोहोळ यांचं नाव न घेता भाजपला टार्गेट केलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PAK vs UAE Update: पाकिस्तानची लाचारी पुन्हा दिसली... पैशांसाठी आत्मसन्मान ठेवला गहाण; Jay Shah यांनी कान टोचताच खेळायला तयार

Municipal Corporation Election : महापालिका निवडणुकीसाठी लागणार २४ हजार कर्मचारी

Latest Marathi News Updates : पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त पुण्यात भव्य ड्रोन शो

Kannad News : हैदराबाद गँझेटीयरनुसार बंजारा समाजाला आरक्षण द्या; मुख्यमंत्री फडणवीसांकडे निवेदन देऊन केली मागणी

Kunbi Certificates: ''भुजबळांना कुणबी प्रमाणपत्रांबद्दल आक्षेप असेल तर..'', फडणवीसांनी स्पष्टच शब्दात सांगितलं

SCROLL FOR NEXT